वाढत्या लॉकडाउनमुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. उद्योगधंदे बंद झाले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांसाठी तर जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे या प्रतिकूल परिस्थितीत त्वरीत लॉकडाउन उठवावा अशी मागणी अभिनेता कमाल खानने सरकारकडे केली आहे.

सर्वाधिक वाचकपसंती – “कतरिनाने माझ्याकडे येउन सलमानची तक्रार केली होती”; शोएब अख्तरचा दावा

सर्वाधिक वाचकपसंती – १५ दिवसांत करोनाने घेतला पाचव्या संगीतकाराचा बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

“जर लहान मुलं आणि काही लोकं अन्नाशिवाय रस्त्यावर मरत असतील तर खरोखर हे अमानुष कृत्य आहे. लॉकडाउन त्वरीत समाप्त करायला हवा. तरच एक कोटी लोक आपल्या घरी परतू शकतील. तुम्ही या लोकांना काही मोजक्या ट्रेन सोडून घरी पाठवू शकत नाही. कृपया माझ्या विनंतीचा स्विकार करा.” अशा आशयाचे ट्विट कमाल खानने केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कमाल खान आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही काळात तो लॉकडाउनच्या निमित्ताने सातत्याने मोदी सरकारवर टीका करत आहे. या पार्श्वभूमीवर त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.