23 November 2020

News Flash

“खूप उडत होते, आता शांत झाले”; सुशांत प्रकरणावर कृष्णा अभिषेकने दिली प्रतिक्रिया

सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला दोन महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणावर आता अभिनेता कृष्णा अभिषेक याने प्रतिक्रिया दिली आहे. इंडस्ट्रीमधील काही लोक आधी खूप उडत होते, पण आता शांत झाले आहेत. असा उपरोधिक टोला त्याने लगावला आहे.

“लडेंगे साथी जीतेंगे साथी”; डॉ. काफिल खान यांच्या सुटकेवर अभिनेत्याने व्यक्त केलं समाधान

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत कृष्णाने सुशांत मृत्यू प्रकरणावर भाष्य केलं. तो म्हणाला, “सुशांत एक उत्तम कलाकार होता. त्याच्यासारख्या गुणी कलाकाराचा इतक्या कमी वयात मृत्यू होणं ही एक दुदैवी घटना आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्यावर आता गांभिर्याने चर्चा केली जातेय. लोक आता स्वत:च्या आरोग्यावर लक्ष देत आहेत. मी काही कलाकार पाहिले जे मानसिक आरोग्याची खिल्ली उडवायचे. डिप्रेशनमध्ये असलेल्या कलाकारांवर शेरेबाजी करायचे. पण आता ते देखील जमीनीवर आले आहेत. इंडस्ट्रीमधील काही लोक खूप उडत होते आता शांत झाले आहेत.”

“तुझं डोकं ठिकाणावर आहे का?” विचित्र फोटोमुळे अभिनेत्रीला केलं जातंय ट्रोल

सुशांत प्रकरणात आलं वेगळं वळण

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणात तपास करणारी एनसीबी ही तिसरी केंद्रीय यंत्रणा आहे. मुंबई पोलीस, सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) प्रमाणे एनसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा दावा रियाने अ‍ॅड. सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत केला. रियाने आजवर अमली पदार्थाचे सेवन केलेले नाही. मात्र तपासादरम्यान एनसीबीला रक्त किंवा अन्य चाचण्या आवश्यक वाटल्यास त्यासही ती तयार असल्याचे अ‍ॅड. मानेशिंदे यांनी सांगितले.

रियाच्या फोनमधून मिळवलेल्या चॅट्समध्ये ती सॅम्युअल मिरांडासोबत ड्रग्सविषयी चर्चा करत असल्याची समोर आली. रियाचे हे रिट्रीव चॅट्स असून तिने ते यापूर्वी डिलिट केले होते. यातील पहिल्या संभाषणात ती गौरव आर्यासोबत ड्रग्सविषयी बोलताना दिसत आहे. हे मेसेज ८ मार्च २०१७ चे आहेत. या चॅट्सविषयी खुलासा होताच सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने रियाविरोधात त्वरित कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2020 6:48 pm

Web Title: krushna abhishek reaction on sushant singh rajput case mppg 94
Next Stories
1 सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा; हत्या झाल्याचे पुरावे नाहीत
2 Video : लेखकांच्या मानधनाबाबत क्षितिज पटवर्धनचं महत्त्वपूर्ण मत
3 नवी मालिका ‘लाडाची मी लेक गं’!
Just Now!
X