सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील संशयीत आरोपी रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने (NCB) अटक केली आहे. अंमली पदार्थ खरेदी व सेवन करण्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली आहे. एनसीबीने केलेल्या या कारवाईवर अभिनेत्री कुब्रा सैत हिने प्रतिक्रिया दिली आहे. “अद्याप खूनाचा आरोप सिद्ध झालेला नाही”, असं म्हणत तिने रिया चक्रवर्तीवर टीका करणाऱ्या नेटकऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अवश्य पाहा – ड्रग्स प्रकरणात संजना गलरानीला अटक; ४ दिवसांत दुसरी अभिनेत्री पोलिसांच्या ताब्यात

“हे ब्रम्हांड रियाच्या पालकांना या प्रतिकूल परिस्थितीत लढण्यासाठी शक्ती देवो. रियाला एनसीबीने अटक केली आहे. तिच्यावरील खूनाचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही. आता माध्यमं तिच्याबद्दल काय चर्चा करत असतील याची कल्पना मी करु शकते.” अशा आशयाचं ट्विट करुन कुब्राने रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला आहे. या ट्विटमार्फत तिने रियाच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अवश्य पाहा – “तुम्ही स्वत:ला शेरलॉक होम्स समजता का?”; सोन्या अयोध्या ट्रोलर्सवर भडकली

यापूर्वी रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक आणि सॅम्युअल मिरांडा या दोघांना अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती. रिया चक्रवर्ती ही कुटुंबातील ही दुसरी अटक आहे. या घडामोडीमुळे सुशांतच्या मृत्यूनंतर दोन महिने चौकशी करणाऱ्या मुंबई पोलिसांना अंमलीपदार्थाबाबतचे तपशील का मिळू शकले नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शोविक, मिरांडा यांनी सुशांतला अंमलीपदार्थाच्या नशेची सवय लावून अंमलीपदार्थ पुरवल्याचे पुरावे एनसीबीच्या हाती लागले आहेत. सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) नोंदवलेल्या गुन्ह्य़ात रियासह शोविक आणि मिरांडा संशयित आरोपी आहेत.