News Flash

कुणाल रॉय कपूर आता दिग्दर्शक!

‘देल्ली बेल्ली’ आणि ‘नौटंकी साला’ या चित्रपटांमुळे लोकप्रिय ठरलेला अभिनेता कुणाल रॉय कपूर आता दिग्दर्शनात पदार्पण करीत असून आपण सामाजिक संदेश असलेला ‘डार्क कॉमेडी’ स्वरूपाचा

| May 9, 2013 03:47 am

‘देल्ली बेल्ली’ आणि ‘नौटंकी साला’ या चित्रपटांमुळे लोकप्रिय ठरलेला अभिनेता कुणाल रॉय कपूर आता दिग्दर्शनात पदार्पण करीत असून आपण सामाजिक संदेश असलेला ‘डार्क कॉमेडी’ स्वरूपाचा चित्रपट करीत आहोत, असे कुणाल रॉय कपूरने म्हटलेय.
अद्याप त्याने आपल्या चित्रपटाचे नाव निश्चित केले नसून कलाकार कोण कोण असतील ते आता ठरविले जात आहे. वर्षअखेरीस चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले जाणार आहे.
प्रेक्षक मला विनोदी भूमिका साकारण्यासाठी ओळखतात म्हणून मला बहुतांशी विनोदी भूमिकांसाठीच विचारणा होतेय. परंतु, कोणत्याही एकाच प्रकारच्या भूमिकांसाठी मी स्वत:ला सीमित ठेवू इच्छित नाही. अभिनयगुण दाखविण्याची संधी देणाऱ्या अन्य भूमिकाही मला करायला नक्कीच आवडतील. पटकथा चांगली असणे हा चित्रपट निवडतानाचा अतिशय प्रमुख मुद्दा ठरतो. सध्या कुणाल आणि वीर दास एकत्रितपणे ‘गोलू और पप्पू’ या चित्रपटासाठी काम करीत असून ३१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘ये जवानी है दिवानी’मध्येही कुणाल पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2013 3:47 am

Web Title: kunal roy kapur now in direction field
टॅग : Entertainment
Next Stories
1 ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ रसिकांचा सर्वाधिक आवडता सिनेमा!
2 आता सासूबाईंसाठी अजय देवगणने घेतला पुढाकार!
3 …जेव्हा शाहरूख, आमिर खान, ह्रतिक रोशन धर्मेंद्रसोबत नाचतात
Just Now!
X