सहा ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या ‘ला ला लँड’ या सिनेमातील अभिनेत्री एमा स्टोनला फोर्ब्स मासिकाने जगभरातील सर्वात जास्त कमाई करणाी अभिनेत्री घोषीत केले. २८ वर्षीय या हॉलिवूड अभिनेत्रीला गेल्या वर्षभरात २.६ कोटी डॉलर रुपयांची कमाई केली.

‘ला ला लँड’ सिनेमातील सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी एमा स्टोनची जागतिक स्थरावर प्रशंसा झाली. तिने यावर्षी स्त्री- पुरुष समानतेसाठीही आवाज उठवला होता. तिच्या मानधनाची बरोबरी करावी यासाठी तिच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्याच्या मानधनात घट करण्यात आली होती असे स्वतः एमीने सांगितले होते.

‘हे बेबी’मधील ‘ऐंजल’ आठवते का?

एमाच्या या सिनेमाने जगभरात ४४.५ कोटी डॉलर्सची कमाई केली होती. एमाने या सिनेमासाठी अनेक ऑडिशनही दिल्या होत्या. ‘ला ला लँड’ सिनेमाला ऑस्करसाठी १४ नामांकनं मिळाली होती. त्यातील सहा पुरस्कारांवर या सिनेमाने आपले नाव कोरले.

या यादीत दुसऱ्या स्थानावर जेनिफर एनिस्टन आहे. तिने गेल्यावर्षी २.५ कोटी डॉलर एवढी कमाई केली. तिला अमेरिकन सिटकॉम फ्रेंड्सकडून सतत रॉयल्टी मिळते. याशिवाय ती अमीरात एअरलाइन्सची ब्रँड अॅम्बेसिडर आहे. या यादीत जेनिफर लॉरेन्सचे नाव तिसऱ्या स्थानावर आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती पहिल्या स्थानावर होती.

…हे आहेत बॉलिवूडचे ‘इंजिनिअर’ कलाकार

लॉरेन्सने गेल्या वर्षभरात २.४ कोटी डॉलर्स एवढी कमाई केली आहे. २०१६ मध्ये लॉरेन्सचे कमवलेल्या रकमेपेक्षा या वर्षाची कमाई ५० टक्क्यांनी कमी आहे. २०१६ मध्ये तिने ४.६ कोटी डॉलर्स एवढी कमाई केली होती.