छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील डॉ. हाथी अर्थात अभिनेता कवी कुमार आझाद यांनी काही दिवसापूर्वी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्यामुळे चित्रपटसृष्टीबरोबरच त्यांच्या चाहत्यांना प्रचंड धक्का बसला होता. मुळात डॉ.हाथी यापुढे परत कधीच दिसणार नाही या एकाच कल्पनेने चाहत्यांच्या डोळ्यांच्या कडा आपोआप पाणावल्या. मात्र कवी कुमार आझाद यांच्या निधनानंतरही ते काही काळ प्रेक्षकांच्या भेटीला येतील असं दिसून येत आहे.

‘तारक मेहता’मधील अभिनेत्री मुनमुन दत्तने एक पोस्ट शेअर केली असून यात डॉ.हाथी यांचा अखेरच्या सीनचा फोटो आहे. हा फोटो म्हणजे कवी कुमार आझाद यांनी केलेला अखेरचा सीन असल्याचं म्हटलं आहे.

THIS IS HOW WE REMEMBER YOU and WILL ALWAYS REMEMBER YOU. . .One of the cleanest soul, the most jovial, happy person who would greet everyone with a huge smile in the morning. We could hear you sing from a distance and would know that you have arrived . Someone , who was just unbelievably cute with the way he spoke and a genuine well wisher. Always a huge smile on his face no matter what. . . Words fail to describe what we feel today. There was not a single person on the set today who didn’t have tears in their eyes. We didn’t know we would be in for such a RUDE SHOCK today. Still trying to come to terms with the loss especially when we all just shot a scene together yesterday. Remembering the last BANTER that we all had while shooting.. . . We only, only AND only have sweet memories of you that brings a smile on our faces even on this grey day . Too many cute conversations, teasing and laughter. . I HOPE YOU REST IN PEACE Hathi bhai . . You left for your heavenly abode TODAY. . You’re one of the nicest soul one could have known in their life. I was lucky to know you and forever thankful to you for sharing your special sindhi parathas with me. . Too numb and shocked . . #restinpeace #RIP #TMKOC

A post shared by MUNMUN DUTTA (@mmoonstar) on

‘हा सीन म्हणजे डॉ.हाथी यांची अखेरची आठवण आहे. याच सीनमध्ये आम्ही सारे एकत्र झळकलो. मात्र आता ते आपल्यात नाहीत. मात्र या पुढील तारक मेहताचे जे भाग प्रदर्शित होतील. त्यात हाथी दिसतील. या भागांचं चित्रीकरण कवी कुमारांच्या निधनापूर्वीच झाल्यामुळे ते या भागांमध्ये दिसतील’, असं मुनमुनने सांगितलं.

दरम्यान, कवी कुमार आझाद यांच्या निधनामुळे तारक मेहता मधील डॉ.हाथी हे पात्र पुन्हा कधीच प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही असं वाटत होतं. मात्र मालिकेच्या निर्मात्यांनी हे पात्र यापुढेही कायम राहणार असल्याचं सांगितलं आहे.

‘कवी कुमार यांच्या निधनामुळे आम्हाला ही प्रचंड दु:ख झालं आहे. मात्र मालिकेमध्ये त्यांच्या जागी अन्य दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे यापुढेही हे पात्र आपल्या बरोबर कायम राहणार आहे. इतकंच नाही तर काही काळ कवी कुमार आझाददेखील आपल्याबरोबर असतील, कारण त्यांच्या निधनापूर्वी त्याचे काही सीन चित्रीत करण्यात आले होते, असं निर्माते अमित मोदी यांनी सांगितलं. त्यामुळे काही काळ का असे ना कवी कुमार आझाद डॉ.हाथी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.