गानकोकिळा लता मंगेशकर यांनी ‘वो कौन थी’ (१९६४) चित्रपटात गायलेल्या ‘लग जा गले’ गाण्याला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. याचा आनंद लता दीदींनी व्यक्त केला असून, ५० वर्षे होऊनही हे गाणे तितकेच आवडीने गायले जाते असे म्हटले आहे. कै. मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे साधना आणि मनोज कुमार यांच्यावर चित्रीत करण्यात आले होते.
लता दीदींनी ट्विटवर आपला आनंद व्यक्त केला. ‘लग जा गले फिर ये हसी रात… गाण्याला ५०वर्षे पूर्ण झाली आहेत. अशी मधुर गाणी कधीच जुनी होत नाहीत,’ असे त्यांनी ट्विट केले.