News Flash

वयस्कर महिलेच्या भूमिकेतील ऐश्वर्याचा लूक व्हायरल

ऐश्वर्या त्याच्या बहिणीची म्हणजेच दलबीर कौरची भूमिका साकारत आहे.

सरबजीत सिंग फॅनक्लबच्या ट्विटर अकाउन्टवर ऐश्वर्याची सेटवरील काही छायाचित्रे टाकण्यात आली आहे.

आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिच्या आगामी चित्रपटात वयस्कर महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘जझ्बा’ चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पुनर्पदार्पण केल्यानंतर ऐश्वर्या आता सरबजीत सिंगवरील आत्मचरित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार करत आहे.
सरबजीत सिंग फॅनक्लबच्या ट्विटर अकाउन्टवर ऐश्वर्याची सेटवरील काही छायाचित्रे टाकण्यात आली आहे. यात तिने पंजाबी ड्रेस परिधान केलेला दिसत असून मोकळे आणि हलकेसे पांढरे केसही यात दिसतात. ही छायाचित्रे पाहता ऐश्वर्याने खास भूमिकेकरिता वजन वाढविल्याचे दिसते. सरबजीत या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिका साकारणार आहे. तर ऐश्वर्या त्याच्या बहिणीची म्हणजेच दलबीर कौरची भूमिका साकारत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 4:50 pm

Web Title: leaked aishwarya rai bachchans look in omung kumars sarbjit biopic
Next Stories
1 रणबीर-कतरिनाचा ‘ब्रेकअप’?
2 कोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनाला पोहचली ‘चला हवा येऊ द्या’ची टीम
3 अक्षयचा निमरतसोबत रोमॅण्टिक अंदाज, ‘एअरलिफ्ट’मधील ‘सोच ना सके’ गाणे प्रदर्शित
Just Now!
X