आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलिन फर्नांडिस. जॅकलिनने कलाविश्वात पदार्पण केल्यापासून तिची कायम चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. उत्तम अभिनय आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणारी जॅकलिन या लॉकडाउनच्या काळाही चर्चेत येत आहे. अलिकडेच ती सलमान खानसोबत एक म्युझिक अल्बममध्ये झळकली होती. त्यामुळे तिच्याविषयीच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत होत्या. त्यातच आता तिने केलेल्या एका वक्तव्यामुळे तिची चर्चा सुरु झाली आहे. काम करताना मला लॉकडाउनचा विसर पडतो असं ती म्हणाली आहे.

लॉकडाउन असल्यामुळे सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण घरात अडकला आहे. मात्र जॅकलिन या वेळेचा सदुपयोग करत आहे. घरात राहून ती स्वत:ला वेळ देण्यासोबतच तिचं कामही करत आहे. विशेष म्हणजे या सगळ्या कामाच्या गराड्यात अनेक वेळा तिला लॉकडाउन असल्याची जाणीव होत नसल्याचं ती म्हणते.

“हो. मी घरी राहूनच खूप काम करत आहे. आधी चित्रपटाचं प्रमोशन, मग प्रदर्शन, सलमान खानसोबतचं गाणं, बादशहासोबचचं गाणं नंतर मासिकासाठी फोटोशूट आणि आता अन्य शो. या सगळ्या कामात मी सतत व्यस्त असते. त्यामुळे मला या सगळ्यात मी लॉकडाउनमध्ये आहे, असं वाटतंच नाही. मला बऱ्याच वेळा लॉकडाउनचा विसरत पडतो”, असं जॅकलिन म्हणाली.

पुढे ती म्हणते, “मी कायम पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते. परिस्थिती कोणतीही असली तरीदेखील मी सकारात्मक विचार करते. त्यामुळे स्वत:ला सतत कामात गुंतवूण ठेवणं. खरं तर सध्याचा काळ हा सगळ्यांसाठीच कठीण आहे. पण यातदेखील मी खूश आहे, कारण मी स्वत:ला अनेक कामात गुंतवूण ठेवलं आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अलिकडेच जॅकलिनचा मिसेस सीरिअल किलर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने जॅकलिनच्या अभिनयाची नवीन बाजू प्रेक्षकांना पाहता आली. तसंच या चित्रपटाव्यतिरिक्त ती सलमान खानसोबत ‘तेरे बिना’ ‘मेरे आंगने मे’ आणि ‘गेंदा फूल’ या म्युझिक अल्बममध्ये झळकली आहे. इतकंच नाही तर तिने चाहत्यांच्या मनोरंजनासाठी घरातूनच ‘होम डांसर’ नावाचा शो शूट केला आहे. यात ती कार्यक्रमाची सूत्रसंचालिका आहे.