News Flash

प्रेमाची लव्हेबल केमिस्ट्री ‘वन फोर थ्री’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

जाणून घ्या चित्रपटाविषयी..

प्रेम ही जगातील एक सुंदर भावना आहे. आजवर जगात बऱ्याच प्रेमकथा अजरामर ठरल्या आहेत आणि अशा बऱ्याच प्रेमकथांचे रूपांतर चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता आले. विशेष म्हणजे सध्या अशाच रोमँटिक चित्रपटांची चलती आहे. सध्याचा प्रेक्षक वर्गही अशा प्रेमबद्ध कथांना विशेष पसंती दर्शवित आहे. म्हणूनच ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ आणि विरकुमार शहा निर्मित ‘वन फोर थ्री’ हा प्रेममय भावना व्यक्त करणारा आणि खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून प्रदर्शनाच्या वाटेवर पाऊले टाकत हा चित्रपट प्रेक्षकांसाठी सज्ज आहे.

लॉकडाउनच्या काळात सर्व नियमावलींचे शिस्तबद्ध पालन करून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते आणि नुकतेच या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झाले आहे. नाशिक, त्रिंबक, इगतपुरी, जखोरी गांव, गोटी गाव येथे या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शक योगेश पांडुरंग भोसले दिग्दर्शित हा प्रेमाची परिभाषा मांडणारा चित्रपट असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण योग्यरीत्या पार पाडले. शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ आणि विरकुमार शहा निर्मित वन फोर थ्री’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.

अभिनेता वृषभ शहा यांची नकारात्मक भूमिका या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. लहानपणापासून अभिनयाची कला जोपासणारा वृषभ पहिल्यांदाच मोठया पडद्यावर अभिनयावरिल त्याचे प्रेम साकारताना दिसेल. शिवाय शीतलचीही धमाकेदार एन्ट्री येथे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे संगीत संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई केरला यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे.

प्रेमाचे लव्हेबल फंडे लवकरच ‘वन फोर थ्री’ या नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. आता हा चित्रपट प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर केव्हा मांडेल याकडे साऱ्या सिनेरसिकांचे लक्ष लागून राहिले आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2021 5:17 pm

Web Title: lovestory one for three movie avb 95
Next Stories
1 “तुमच्यासाठी लस १ मे नंतर आहे”, अनिल कपूर यांच्या पोस्टवर चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
2 कंगना रणौत पुन्हा भडकली; “बॉलिवूडमधील माफिया गँग अफवा पसरवतात”
3 अजय देवगणचे डिजिटल विश्वात पदार्पण, ‘रुद्र द ऐज ऑफ डार्कनेस’मधील लूक प्रदर्शित
Just Now!
X