कान्स चित्रपट महोत्सवात क्रिटिक्स ‘विक’ व्हुअर्स चॉइस पुरस्कार पटकावणा-या ‘लंचबॉक्स’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रितेश बत्रा दिग्दर्शित या चित्रपटात इरफान खान, निमरत कौर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ट्रेलरमध्ये इला (निमरत कौर) आणि साजन (इरफान खान) हे दोघेही एकमेकांना लंचबॉक्समधून चिठ्ठया पाठवताना दिसतात. यामधून दोघांची मैत्री होते आणि त्यांच्या एकटेपणा, आठवणी, भीती आणि अगदी लहान आनंदाबाबत एकमेकांना सांगू लागतात. दोन अनोळखी व्यक्ती न भेटता केवळ डब्यामुळे कशा जोडल्या जातात आणि त्यांच्यामधील संवाद चित्रपटात चित्रीत करण्यात आला आहे. ‘लंचबॉक्स’ २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.