24 February 2020

News Flash

Video : राजकुमार राव-मौनीच्या ‘मेड इन चायना’चा ट्रेलर प्रदर्शित

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून हा चित्रपट विनोदीपट असल्याचं दिसून येत आहे

मेड इन चायना

बॉलिवूडमध्ये विविध भूमिकांमधून आपले अभिनय कौशल्य दाखवणारा अभिनेता राजकुमार राव सध्या साऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘स्त्री’ या चित्रपटात दमदार अभिनय करणारा राजकुमार लवकरच मेड इन चायना या चित्रपटामध्ये झळकणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
अभिनेत्री मौनी रॉय आणि राजकुमार यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापुर्वी प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटामध्ये राजकुमार रघु मेहता या गुजराती व्यावसायिकाची व्यक्तीरेखा साकारत आहे.

प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधून हा चित्रपट विनोदीपट असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. लहान-सहान उद्योग करणारा रघु मेहता हा व्यावसायिक कायम नवनवीन बिझनेस ट्राय करत असतो. या क्षेत्रामध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी तो चीनला जातो आणि येथे त्याला गुप्तरोगांवर उपचार करणारं एक प्रोडक्ट मिळतं. हे प्रोडक्ट तो भारतामध्ये येऊन विकत असतो. त्याच्या या संपूर्ण प्रवासामध्ये नेमके कोण कोणते रंजक किस्से घडतात ते या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत.

दरम्यान, या चित्रपटामध्ये मौनी रॉयने राजकुमार रावच्या पत्नीची मुख्य साकारली आहे. तर बोमण इराणीने डॉ. वर्धी या सेक्सोलॉजिस्टची व्यक्तीरेखा वठविली आहे. यांच्या व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये परेश रावल, अमायरा दस्तूर, सुमीत जोशी, मनोज व्यास हे कलाकारही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

First Published on September 18, 2019 4:28 pm

Web Title: made in china trailer out rajkumar rao ssj 93
Next Stories
1 …म्हणून आई होण्याची मल्लिकाला वाटतेय भीती
2 व्हिएफएक्सच्या बळावर होणार पहिल्यांदाच १०० मराठी लघुपटांची निर्मिती
3 प्रदर्शनापूर्वीच रानू मंडल यांच्या दुसऱ्या गाण्याचा सोशल मिडियावर धुमाकूळ
Just Now!
X