News Flash

Trailer Launch : जाणून घ्या काय आहे ‘मेड इन हेवन’ वेबसीरिज

दिल्लीमधील दोन वेडिंग प्लानर्स तारा व करण यांच्या जीवनांची झलक दाखवण्यात आली आहे

वेबसीरिज हे सध्या तरुणांना सर्वाधिक आवडणारे माध्यम झाले आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर उपलब्ध होणाऱ्या या सीरिज प्रसिद्ध होताना दिसत आहेत. अॅमेझॉनच्या वेबसीरिज मागच्या काही काळात मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. ‘मिर्झापूर’मागोमाग आता प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेली ती वेब सीरिज आहे ‘मेड इन हेव्हन’. या नव्या वेब सीरिजचा ट्रेलर आणि त्यातील कलाकारांचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. हा ट्रेलर या सीरिजच्या कथानकासाठी विशेष गाजत आहे.

रिमा कागती आणि झोया अख्तरच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या वेब सीरिजचं दिग्दर्शन खुदद् झोया अख्तर, नित्या मेहरास, प्रशांत नायर आणि अलंकृता श्रीवास्तव यांनी केलं आहे. या वेब सीरिजचा ट्रेलर पाहता लग्न या एका विषयाभोवती फिरणाऱ्या समजुती आणि संकल्पनांवर ‘मेड इन हेव्हन’मधून भाष्य करण्यात येणार असल्याचे समजते. मोठ्या घरांमध्ये होणारे दिमाखदार विवाहसोहळे आणि समाजातील उच्चभ्रू वर्गाच्या लग्नाविषयीच्या अपेक्षा या विषयाभोवती ही वेबसीरिज फीरते. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना दिल्लीमधील दोन वेडिंग प्लानर्स तारा व करण यांच्या जीवनांची झलक दाखवण्यात आली आहे. झोया अख्तर व रीमा कागती यांची निर्मिती असलेली सिरीज ‘मेड इन हेवन’ ८ मार्च रोजी २०० देश व केंद्रशासित प्रदेशांमध्ये फक्त अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर सादर होण्यास सज्ज आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2019 6:55 pm

Web Title: made in heaven trailer launch web series amazon prime
Next Stories
1 ‘छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नसून तो एक विश्वास आहे’
2 VIDEO : लगीन घाईची धम्माल गोष्ट सांगणाऱ्या ‘वेडिंगचा शिनेमा’चा टीझर पाहिलात का?
3 घटस्फोटाचा निर्णय बदलण्याचा कुटुंबीयांनी दिला होता सल्ला – मलायका
Just Now!
X