04 July 2020

News Flash

माधुरी दीक्षित कलाविश्वाच्या मदतीसाठी पुढे; चित्रपट महामंडळाला केली मदत

यापूर्वी रितेश देशमुख-जेनेलियानेदेखील मदतीचा हात पुढे केला होता

सध्या देशामध्ये करोनामुळे लॉकडाउन घोषित केला आहे. या काळात अत्यावश्यक सुविधा सोडल्या तर सारं काही बंद आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहे. मात्र या गरजुंच्या मदतीसाठी अनेकांनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. यात काही सेलिब्रिटी मंडळींचाही समावेश आहे. त्यातच आता अभिनेत्री माधुरी दीक्षित गरजुंच्या मदतीसाठी पुढे आली आहे. तिने चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून गरजुंना आर्थिक मदत केली आहे.

लॉकडाउनमुळे कलाविश्वातील कामकाजदेखील ठप्प झालं असून या क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत. त्यामुळे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ या गरजुंना आर्थिक तसंच अन्नधान्य पुरवून मदत करत आहे. आतापर्यंत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाकडून २ हजार गरजुंपर्यंत मदत पोहोचविण्यात आली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता गरजुंची संख्या वाढत असल्यामुळे महामंडळाने कलाविश्वातील सेलिब्रिटींनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. विशेष म्हणजे महामंडळाने केलेल्या या आवाहनाला माधुरीने प्रतिसाद दिला आहे. तिने आर्थिक मदत केली आहे.

दरम्यान, माधुरीने मदत केल्यानंतर अ.भा.म.चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माधुरी दीक्षितचे आभार मानले आहेत. यापूर्वी रितेश देशमुख-जेनेलियानेदेखील मदतीचा हात पुढे केला असून त्यांनी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 3:41 pm

Web Title: madhuri dixit donates some money for poor people ssj 93
टॅग Coronavirus
Next Stories
1 Video : ईद मुबारक! रमजान ईदवरील ‘ही’ बॉलिवूड गाणी कधी ऐकली आहेत का?
2 बिग बींनी दिल्या मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा; म्हणाले…
3 ‘तारक मेहता..’मधील दया बेनने केले आहे ऐश्वर्या रायसोबत या चित्रपटात काम
Just Now!
X