महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. हा पेच सोडवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायालयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात सुरु असलेल्या या सत्तासंघर्षावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी या राजकीय खेळाची तुलना प्रसिद्ध मालिका ‘गेम ऑफ थ्रोन्स’शी केली आहे.

काय म्हणाले नटकरी..

गेम ऑफ थ्रोन्स ही राजकारणावर आधारित असलेली एक मालिका आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा आपल्या राजकीय महत्वकांशा पूर्ण करण्यासाठी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध पातळींवर प्रयत्न करताना दिसतात. सत्ता मिळवण्यासाठी अगदी वाट्टेल त्या थराला जाणारे राज्यकर्ते या मालिकेत दाखवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थितीही अशीच काहीशी असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरुन दिल्या जात आहेत.