२६ नोव्हेंबर २००८ ही तारीख कोणताही भारतीय व्यक्ती विसरणार नाही. या दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. मुंबईतील सहा ठिकाणी दहतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात १६० जणांचा मृत्यू झाला. जवळजवळ ६० तास दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमक सुरु होती. त्यामुळे हा दिवस प्रत्येकाच्या स्मरणात आहे. याच दिवसावर आधारित ‘मेजर’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

२६/११ या हल्ल्यात ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करत असताना मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद झाले. त्यांच्याच जीवनावर आधारित’ ‘मेजर’ हा चित्रपट असून यात अभिनेता अदिवी शेष मुख्य भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री शोभिता धूलिपालाने या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.


दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबूची निर्मिती असलेला मेजर हा चित्रपट येत्या २ जुलै २०२१ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात अभिनेता अदिवी शेष, मेजर संदीप उन्नीकृष्णन यांची भूमिका साकारणार आहे.

आणखी वाचा- ‘तांडव’च्या वादावर शर्मिला टागोर यांनी सैफला दिला ‘हा’ सल्ला

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन शशी किरण करत असून यात अदिव शेषसोबत अभिनेत्री शोभिता धूलिपाला आणि सई मांजरेकरदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.