महेश कोठारे दिग्दर्शित ‘धडाकेबाज’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अश्विनी भावे आणि दिपक साळवी या कलाकारांच्या उत्तम अभिनयाने सजलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याकाळी या चित्रपटातील गंगाराम आणि कवट्या महाकाळ या भूमिका सर्वाधिक गाजल्या. इतकंच नाही तर कवट्या महाकाळ ही व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या आठवणींत आहे. विशेष म्हणजे ही भूमिका तब्बल आठ जणांनी साकारल्याचं सांगण्यात येतं.एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शक महेश कोठारे यांनी याविषयी सांगितलं.

संपूर्ण चित्रपटामध्ये मुखवटा घालून वावरणाऱ्या कवट्या महंकाळ ही भूमिका तब्बल आठ वेगवेगळ्या कलाकारांनी साकारली होती. प्रथम ही भूमिका बिपीन वर्टी यांनी साकारली होती. मात्र अन्य चित्रपटांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांना हा चित्रपट करण्यासाठी तारखा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे त्यांनी या चित्रपटातून काढता पाय घेतला. त्यानंतर ही भूमिका वेगवेगळ्या कलाकारांनी साकारली. विशेष म्हणजे या संपूर्ण चित्रपटामध्ये कलाकारांना मुखवटा घालून वावरायचं होतं. त्यामुळे हे आठ कलाकार नक्की कोण ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

वाचा : ‘तुझ्यात जीव रंगला’पूर्वी राणादा करायचा हे काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कवट्या महाकाळ ही भूमिका प्रथम साकारणारे बिपीन वर्टी हे केवळ अभिनेताच नाही तर उत्तम दिग्दर्शकही आहेत. त्यांनी ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘चंगू मंगू’ आणि ‘डॉक्टर डॉक्टर’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे.