27 February 2021

News Flash

Corornavirus : ‘ओम फट् स्वाहा करून टाकूया करोनाचा’; महेश कोठारेंनी शेअर केला तात्या विंचूचा भन्नाट व्हिडीओ

पाहा काय म्हणतोय तात्या विंचू?

महेश भट्ट

जगभरात करोना विषाणूचा हाहाकार पाहायला मिळतोय. वैयक्तिक व सरकारी पातळीवर अनेक खबरदाऱ्या घेतल्या जात आहेत. सेलिब्रिटीसुद्धा सोशल मीडियाद्वारे जनजागृती करत आहेत. अशातच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच थरकाप उडवणाऱ्या महेश कोठारे यांच्या ‘तात्या विंचू’ने त्याच्या अंदाजात लोकांसाठी संदेश दिला आहे. खुद्द महेश कोठारे यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘ओम भट स्वाहा करूयात या करोना व्हायरसचा’ असं तात्या विंचू या व्हिडीओत म्हणतोय.

काय म्हणतोय तात्या विंचू?

‘नमस्कार, ओळखलं का मला.. नाही ओळखलं.. एक मिनिट.. (तोंडावरील मास्क काढून) आता ओळखलं का… नमस्कार.. मी तात्या विंचू..ओम भट स्वाहा.. मेहरबान कदरदान करोना व्हायरससे है पुरी दुनिया परेशान… हा करोना व्हायरस खुद्द तात्या विंचूपासून खतरनाक निघाला. लोकांची झोप उडवून ठेवली या करोना व्हायरसने.. म्हणून मित्रांनो..आपण सगळ्यांनी मिळून या करोना व्हायरसचा खात्मा करूया.. म्हणजे ओम भट स्वाहा करून टाकूया या करोना व्हायरसला.. म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा.. बाहेर जाताना मास्क घाला.. जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका… गरज नसताना उगाच बाहेर पडू नका.. आणि सगळ्यात महत्त्वाचं या करोना व्हायरसबद्दल अफवा पसरवू नका.. नाहीतर करून टाकीन ओम भट स्वाहा..’

आणखी वाचा : ‘घाडगे & सून’ फेम भाग्यश्री व भूषण प्रधानमध्ये नेमकं काय शिजतंय?

एका ट्विटर युजरने पोस्ट केलेला हा व्हिडीओ महेश कोठारेंनी त्यांच्या अकाऊंटवर शेअर केला आहे. जगभरात, तसंच देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केंद्र सरकार तसंच राज्यसरकारकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपययोजना करण्यात येत आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालंय, मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच देशातील करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 11:29 am

Web Title: mahesh kothare shared tatya vinchu video on corona virus ssv 92
Next Stories
1 सई मांजरेकर नव्या रुपात, सलमानने शेअर केला व्हिडिओ
2 हनिमूनसाठी गेलेल्या पराग कान्हेरेला नेटकऱ्यांनी दिला ‘हा’ सल्ला
3 ‘मुगल ए आझम’चा या भाषेतही केला होता रिमेक,पण…
Just Now!
X