News Flash

महेश मांजरेकर यांचं दमदार पुनरागमन; केली ड्रीम प्रोजेक्टची सुरुवात

महेश मांजरेकर यांचा सस्पेन्सने भरलेला मराठी चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. त्यांच्या या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली आहे. हा एक क्राईम थ्रिलर पठडीतील चित्रपट असेल असं म्हटलं जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी ‘एन एच स्टुडिओज’ने स्विकारली आहे. आजवर पिंक, शिवाय, बेगम जान, ओमर्ता यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारी करणारा हा स्टुडिओ यावेळी एका मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे.

अवश्य पाहा – ये फिटनेस की बात है! पाहा मलायकाचा ‘हॉट योगा’

मुंबईमध्ये नुकतेच या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली. २८ ऑक्टोबर रोजी चित्रपटाचा पहिला सीन शूट करण्यात आला. पुढच्या वर्षी म्हणजे २०२१ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या चित्रपटाबाबत महेश मांजरेकर म्हणाले,

अवश्य पाहा – फॅट ‘गंगूबाई’चा फिट अवतार; ८ महिन्यात २२ किलो वजन केलं कमी

“गेली कित्येक वर्षं मी या चित्रपटाच्या कथेचा विचार करत होतो. माझ्या डोक्यात ही कथा वर्षानुवर्षं जणू बंदिस्त होती. पण तिला प्रत्यक्षात उतरण्याचा योग येत नव्हता. दरम्यान मी एकदा विजयला भेटलो आणि त्याला ही कथा अगदी सहजच ऐकवली. कथा ऐकता क्षणी विजय इतका खुश झाला, त्याने माझ्याकडे हा सिनेमा बनवण्याची इच्छा व्यक्त केली. माझी ही कथा विजयने एन एच स्टुडिओजचे निर्माते नरेंद्रजी यांना ऐकवली आणि त्यांनीही या सिनेमाच्या निर्मितीसाठी लगेचच होकार कळवला. आता तर या सिनेमाचे शुटिंगही सुरू झालेय. माझा हा ड्रिम प्रोजेक्ट आता प्रत्यक्षात साकारतोय याचा मला आनंद आहे, ज्यासाठी मी माझे निर्माते आणि सहनिर्माते यांचे मनापासून आभार मानतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 4:57 pm

Web Title: mahesh manjrekar make crime thriller in marathi mppg 94
Next Stories
1 अभिनेत्रीनं शेअर केला ‘बाथरुम सेल्फी’; काही तासांत मिळाले ६ लाख व्हूज
2 Bigg Boss : ‘या’ स्पर्धकाला करावा लागला आर्थिक संकटाचा सामना, म्हणाला…
3 “मला न्याय का मिळाला नाही?”; नाना पाटेकर यांच्या पुनरागमनावर तनुश्री दत्ता संतापली
Just Now!
X