महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळते. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतीश आळेकर, शिवाजी साटम या दिग्गज कलावंतांच्या भूमिका आहेत.
‘न्यायदेवता आंधळी असते…आम्ही डोळस होतो’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. वृद्ध व्यक्ती एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध आवाज उठवताना या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं आहे. त्यासाठी ते कोणता मार्ग अवलंबतात, कशाप्रकारे ते अन्यायाला वाचा फोडतात आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात हे चित्रपट प्रदर्शनानंतरच स्पष्ट होईल.
वाचा : या कारणामुळे ‘सेक्रेड गेम्स’ची निर्मिती करणारी ‘फँटम फिल्म्स’ कंपनी झाली बंद
हा चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. सेन्सॉर बोर्डाने यातील एका वाक्यावर आक्षेप घेतला होता आणि महेश मांजरेकर यांनी ते वाक्य न बदलण्याची भूमिका घेतली होती. ‘या चित्रपटात आक्षेपार्ह असं काहीच नाही. कायद्याचं उल्लंघन होईल असा कोणताच संवाद नाही. चित्रपटात जे काही संवाद आहेत, ते दाखवणं गरजेचं आहे,’ असं मत महेश मांजरेकर यांनी मांडलं होतं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 6, 2018 2:32 pm