News Flash

अजय देवगणसोबत अफेअर होते का? महिमाने त्यावेळी रंगलेल्या चर्चांवर केला खुलासा

तिने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव आहे. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या चित्रपटातून महिमाने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. पण अचानक एक घटनेनंतर महिमाचे संपूर्ण आयुष्य बदलले. महिमाने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण अभिनेता अजय देवगणसोबत काम करताना त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता महिमाने एका मुलाखतीमध्ये या सर्व अफवा दिग्दर्शकाने पसरवल्या होत्या असे म्हटले आहे.

महिमाने नुकतीच ‘पिंकव्हिला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एकेकाळी सुरु असलेल्या तिच्या आणि अजय देवगणच्या अेफअरच्या चर्चांवर वक्तव्य केले. एका दिग्दर्शकाने त्यावेळी अजयचे माझ्यावर प्रेम आहे अशी अफवा पसरवली होती. त्याचवेळी अजय आणि काजोलचे लग्न झाले होते. या सर्व अफवा दिग्दर्शकाने पसरवल्या होत्या कारण अजय माझ्यासाठी त्या दिग्दर्शकाशी भांडला होता असे महिमा म्हणाली.

आणखी वाचा : भावंडं म्हणत १३ वर्षे लपवलं होतं नातं; आता समलैंगिक जोडप्याने घेतला वेगळं होण्याचा निर्णय

महिमाने अजय देवगण आणि काजोलसोबत ‘दिल क्या करे’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटादरम्यान झालेल्या कार अपघातात महिमाचा चेहरा पूर्णपणे बिघडला होता. पण काही दिवसांनंतर महिमाने पुन्हा चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली तेव्हा दिग्दर्शकांना क्लोजअप घेऊ नका अशी विनंती केली होती. कारण तिच्या चेहऱ्यावरील डाग कॅमेरामध्ये दिसत होते. तरी देखील दिग्दर्शकाने महिमाचे काही क्लोजअप सीन शूट केले होते.

दरम्यान अजयने महिमाला विचारले होते की, ‘तुला हे सीन शूट करायचे नाहीत का?’ त्यावर महिमाने ‘नाही’ असे उत्तर दिले. त्यानंतर अजय दिग्दर्शकाकडे गेला आणि महिमाचे क्लोजअप सीन घेऊ नका असे म्हटले. त्यानंतर त्या दिग्दर्शकाला अजय देवगणनचे महिमावर प्रेम आहे असे वाटले. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या अफेअरच्या चर्चा त्यावेळी रंगल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 11:31 am

Web Title: mahima chaudhry says a director spread rumour that ajay devgn was in love with her avb 95
Next Stories
1 Video: अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहाताच अशी होती रेखा यांची प्रतिक्रिया
2 “गरोदर असल्यामुळे दुसरं लग्न केलं का?”; दिया मिर्झाचं नेटकऱ्याला सडेतोड उत्तर
3 करीनाच्या धाकट्या मुलाचा फोटो रणधीर कपूर यांनी केला शेअर?
Just Now!
X