News Flash

Video : राज कपूर यांच्या गाण्यावर माहिरा खानचा अनोखा अंदाज

रणबीर कपूरच्या आजोबांच्या गाण्यावर माहिराचा हा व्हिडिओ असल्याने सोशल मीडियावर चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी माहिराचं नाव रणबीरसोबत जोडलं गेलं होतं.

mahira khan, adnan ansari
पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट अदनान अन्सारी

पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. फोटो, व्हिडिओ पोस्ट करत माहिरा चाहत्यांशी सतत जोडून राहण्याचा प्रयत्न करते. तिने नुकताच इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या व्हिडिओत ती अभिनेता रणबीर कपूरचे आजोबा राज कपूर यांचं गाणं अनोख्या अंदाजात सादर करताना पाहायला मिळत आहे.

१९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चोरी चोरी’ या चित्रपटातील हे गाणं आहे. ‘जहाँ मै जाती हूँ वही चले आते हो,’ असे बोल असणाऱ्या या गाण्यावर हावभाव करताना दिसते. तिच्यासोबत सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट अदनान अन्सारीसुद्धा पाहायला मिळत आहे.

वाचा : सुनील ग्रोवरला लागली लॉटरी; या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत करणार काम

खरंतर हा व्हिडिओ चर्चेत येण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे ते गाणं. काही दिवसांपूर्वी माहिरा आणि रणबीर कपूर रिलेशनशीपमध्ये आहेत का अशा चर्चा रंगल्या होत्या. माहिरा आणि रणबीर न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर स्वच्छंदपणे फिरताना आणि धुम्रपान करताना पाहिलं गेलं होतं. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर माहिरावर नेटकऱ्यांनी टीकांचा भडीमार केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2018 5:00 pm

Web Title: mahira khan recreates ranbir kapoor grandfather raj kapoor song
Next Stories
1 अनुपम खेर, अमजद अली खान, आशा भोसले यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार
2 BLOG : मुंबई-कोल्हापूर विमानसेवा आणि चित्रपटसृष्टीचे उड्डाण
3 पॉर्न साइटवर कठुआ बलात्कार प्रकरणाचा उल्लेख पाहून खवळलं ‘या’ सेलिब्रिटीचं रक्त
Just Now!
X