बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसह असलेल्या नात्यामुळे नेहमी चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी नेटकऱ्यांनी मलायकावर निशाणा साधून तिला ट्रोलदेखील केले होते. परंतु मलायकाला या गोष्टींचा फारसा फरक पडत नसल्याचे दिसत आहे. नुकताच मलायकाने एक नवे फोटो शूट केले आहे आणि या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने केलेल्या एका नव्या फोटो शूटचे फोटो शेअर केले आहेत. ‘हिंदूस्तान टाईम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार मलायकाने हे फोटो शूट मालदीवच्या समुद्र किनारी केले आहे. तसेच ‘Travel + Leisure India’ या मॅग्झीनसाठी हे फोटो शूट केल्याचे म्हटले जात आहे. या फोटोमध्ये मलायका अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांच्या मनावर जादू केली आहे. या फोटोमध्ये मलायका समुद्र किनारी बसलेली असून तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
मलायकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मलाकाचे मालदीवला सुट्ट्यांचा आनंद लुटतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच मलायका करण जोहरच्या पार्टीमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरने एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये मलायका, अर्जुन कपूर, दीपिका पादूकोण, शाहिद कपूर, समेत कई आणि इतर बॉलिवूड कलाकार हजर असल्याचे दिसत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून या पार्टीमध्ये सेलिब्रिटींनी अमली पदार्थांचे सेवन केल्याचे मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2019 9:55 am