20 October 2020

News Flash

मलाइकाचं चाललंय काय?

एका मुलाखतीदरम्यान मलाइकाने, ‘‘मी सिंगल आहे, पण कुणाचं तरी प्रेम एन्जॉय करते आहे,

अभिनेत्री मलायका अरोरा

अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलाइका अरोरा (पूर्वीची खान) सध्या काय करते आहे, हा शोध प्रसारमाध्यमे घेत होतीच. तोच मलाइकाच्या वक्तव्याने सर्वाना बुचकळ्यात टाकलं आहे. एका मुलाखतीदरम्यान मलाइकाने, ‘‘मी सिंगल आहे, पण कुणाचं तरी प्रेम एन्जॉय करते आहे,’’ असं वक्तव्य केलं. आता ‘सिंगल’ व्यक्ती नेमकं कुणाचं प्रेम एन्जॉय करतेय हे कोडं काही कुणाला सुटत नाहीय. अरबाज आणि मलाइकाच्या घटस्फोटाचं मूळ कारण हे तिचं आणि अर्जुन कपूरमधील नातं आहे, अशी चर्चा होती. मात्र आता हे फक्त ‘गॉसिप्स’ नसून खरं आहे, अशी खात्री जवळजवळ सर्वाचीच पटली आहे. अर्जुन हा खरं तर सलमानची बहीण अर्पिताला ‘डेट’ करायचा. पण, त्यांच्या ‘ब्रेकअप’नंतर काही वर्षांनी त्याच्या आणि मलाइकाच्या नात्याच्या चर्चेमुळे सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला होता.

– मसक्कली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2018 4:11 am

Web Title: malaika arora speak on her relationship status
Next Stories
1 अमृताला लागलं अल्लाउद्दीन खिल्जीचं वेड!
2 शब्दांच्या पलिकडले : तुम इतना जो मुस्करा रहे हो…
3 TOP 10 News: अनुष्काच्या परीपासून रणवीरच्या त्या मैत्रिणीपर्यंत
Just Now!
X