वय हा केवळ आकडा असतो हे अभिनेत्री मलायका अरोराकडे पाहिल्यावर लक्षात येतं. वयाची चाळीशी उलटल्यानंतरही मलायकाचं सौंदर्य आणि तिचा फिटनेस हा एखाद्या पंचविशीतील तरुणीप्रमाणे आहे.त्यामुळे अनेक जण तिच्या फिटनेसचे वेडे आहेत. मलायका तिच्या फिटनेससोबतच स्टाइल स्टेटमेंट आणि फॅशनसाठीदेखील ओळखली जाते. सध्या मलायका चर्चेत आली आहे ती तिच्या स्लिपरमुळे. मलायकाने जीमला जाण्यासाठी घातलेली चप्पल दिसायला अत्यंत साधी असली तरी तिची किंमत जास्त असल्याचं सांगण्यात येतं.

गेल्या ६-७ महिन्यांच्या लॉकडाउनमुळे जीम, पार्लर सारं काही बंद होतं. त्यामुळे सेलिब्रिटी घरातच वर्कआऊट करत होते. मात्र, आता अनलॉकच्या टप्प्यात हळूहळू करत प्रत्येक क्षेत्रातील कामकाज सुरु झालं आहे. यामध्येच जीम पुन्हा सुरु झाल्या असून मलायका तिच्या जीमबाहेर दिसून आली. विशेष म्हणजे यावेळी ती अत्यंत कूल लूकमध्ये दिसत होती. मात्र, तिची स्लिपर अनेकांचं लक्ष वेधत होती.

( फोटो सौजन्य : पिंकव्हिला)

मलायकाने Reebok कंपनीची स्लिपर घातली होती. खरं तर ही स्लिपर अत्यंत साधी दिसत होती. मात्र, ती चक्क ३ हजार रुपयांची होती. त्यामुळे अनेक जणांचं लक्ष त्या स्लिपरकडे वेधलं होतं.

दरम्यान, सेलिब्रिटी कायमच त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल आणि महागड्या वस्तूंमुळे चर्चेत येत असतात.यापूर्वी मलायकाचे कपडे, तिच्या बॅग्सदेखील चर्चेत आल्या आहेत.