News Flash

ममता कुलकर्णीच्या ड्रग माफिया पतीला पोलिसांनी केली अटक

विकी गोस्वामी हा गुजरातमधील एका पोलीस ऑफिसरचा मुलगा

अभिनेत्री ममता कुलकर्णी

आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आणि बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामीला अमेरिकेच्या अंमली पदार्थविरोधी प्रशासनाने अटक केली आहे. विकीला रविवारी केनियामधून अटक करण्यात आली. विकीसोबत ड्रग माफिया गुलाम हुसैनचा मुलगा इब्राहिम, बख्ताश आक्शा यांनाही अटक करण्यात आली आहे. तसेच मूळ पाकिस्तानी असलेल्या एका व्यक्तिची अटक करण्यात आली आहे. हे सगळेच ड्रग्स तस्करीमध्ये फरारी होते. या सगळ्यांना केनियामधून अटक करुन आता अमेरिकेत नेले गेले आहे.

इंडिया टुडेमध्ये आलेल्या वृत्तानुसार, गोस्वामी आणि कुलकर्णी हे दोघंही ड्रग्स माफियासंदर्भात फरारी आहेत. ठाणे पोलीस गोस्वामीला भारतात आणण्याचे प्रयत्न करत आहेत. ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी सांगितले की, आम्ही भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करुन, अमेरिकेतल्या आपल्या दुतावासाशी संपर्क करुन गोस्वामीला भारतात आणण्याचे प्रयत्न करणार आहोत. आतापर्यंत या प्रकरणात डीईए आणि ठाणे पोलीस यांच्यात चांगला संवाद होत आहे.

विकी गोस्वामी हा गुजरातमधील एका पोलीस ऑफिसरचा मुलगा आहे. ८० च्या दशकात त्याने गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवले. काही वर्षांमध्ये त्याने दुबईपासून ते आफ्रीकेपर्यंत सर्वदूर पसरवले. भारतात, सोलापूर फार्मा युनिटमधून मोठ्या प्रमाणात मेथामफेटामाइन जप्त करण्यात आले होते. या प्रकरणात त्याचे नाव प्रामुख्याने समोर येत होते.

याआधी ममतालाही विकी गोस्वामीसोबत अटक करण्यात आली होती. पण नंतर तिला सोडून देण्यात आले होते. विकीचा हा खटला ममताने तब्बल १२ वर्ष लढवला होता आणि त्याची तुरुंगातून सुटकाही केली होती. ममता कुलकर्णीचे नाव छोटा राजनसोबतही जोडले गेले होते. असे म्हटले डाते की, राजन याच्या म्हणण्यानुसार राजकुमार संतोषीने ममताला त्यांच्या चायनागेट या सिनेमात घेतले होते.

mamta-kulkarni-3 फोटो सौजन्यः इंडियन एक्सप्रेस mamta-kulkarni-4 फोटो सौजन्यः इंडियन एक्सप्रेस mamta-kulkarni-5 फोटो सौजन्यः इंडियन एक्सप्रेस mamta-kulkarni-9 फोटो सौजन्यः इंडियन एक्सप्रेस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 12:04 pm

Web Title: mamta kulkarnis husband vicky goswami arrested in kenya
Next Stories
1 PHOTO: मयुरी वाघ-पियुष रानडेचं शुभमंगल!
2 ‘मृत्युंजय’मधील व्यक्तिरेखांचं चित्रण मला भावलं -लीना भागवत
3 PHOTO: ‘फर्स्ट लेडी ऑफ बॉलिवूड’सह किंग खान फोटोसाठी पोझ देतो तेव्हा..
Just Now!
X