News Flash

‘गं सहाजणी’ च्या बँकेत मानसी नाईकची एन्ट्री

जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जात आहे.

५ डिसेंबरच्या विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ग सहाजणी’ ही विनोदी मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरली आहे. या मालिकेतील पात्र आणि घडणाऱ्या घटना वास्तवाशी मिळत्या जुळत्या असल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. जीवनातील मर्म अगदी चपखल पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या मालिकेतून केला जात आहे. दैनंदिन घटनांचा त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे हसतखेळत समाधान करणारी ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात आवडीने पहिली जात आहे. सध्या सुरु असलेल्या चलन बदलाचा विषय या मालिकेत दाखवण्यात आला होता. त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. बँकेतील कर्मचाऱ्यांचे भावविश्व मांडणाऱ्या या मालिकेचा पुढचा भाग खूप रंजक असणार आहे.

या मालिकेच्या येत्या सोमवारच्या ५ डिसेंबरच्या विशेष भागात अभिनेत्री मानसी नाईक या बँकेत पाहुणी कलाकार म्हणून दाखल होणार आहे. तिने या सहाजणींसोबत बँकेत केलेली धमाल हा या भागातला आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू आहे. हजार आणि पाचशे रुपयांच्या चलनबदलांमुळे कामाचा अतिरिक्त ताण पडलेल्या सहाजणींना मानसीच्या येण्यामुळे थोडी उसंत मिळणार असल्यामुळे मंजुळाबाई उसने परतफेड बँकेत सध्या उत्साहाचे वातावरण आहे.संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.

ga-sahajani-670

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या ठेक्यावर नाचवणारी मानसी नाईक सहाजणीच्या या ताफ्यात काय धम्माल करते, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे. एका बँकेत काम करणाऱ्या सहाजणींची गोष्ट सांगणारी ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी झाली आहे. या मालिकेतील शर्वणी पिल्लई (मीना मोडक), नियती राजवाडे(दामिनी), नम्रता आवटे (जुबेदा), पोर्णिमा अहिरे(भीमा), सुरभी भावे (सुश्मिता) आणि मौसमी तोडवळकर (कामिनी) या प्रमुख अभिनेत्रींनीं आपापल्या भूमिकेतून ‘गं सहाजणी’त रंग भरला आहे. बँकेचे खडूस मॅनेजर धबडगावकर म्हणजे अतुल तोडणकर यांची धमाल मस्ती या भागात पाहता येणार आहे. स्टार प्रवाहच्या ‘गं … सहाजणी’ या हटके मालिकेची निर्मिती पुरुषोत्तम बेर्डे यांनी केली असून, एकाच मालिकेत सहा नायिका असा नवा प्रवाह ते घेऊन आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 5:47 pm

Web Title: manasi naiks entry in ga sahajani serial
Next Stories
1 जाणून घ्या, युवी-हेजलच्या लग्नाला कोण लावणार उपस्थिती?
2 ‘नि:शब्द’सारखा चित्रपट करण्यासाठी शाहरुख तयार?
3 ‘पद्मावती’मधील ‘घुमर…’ गाण्यासाठी साकारली ‘राजेशाही’ प्रतिकृती!
Just Now!
X