अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यानंतर मंदिरा सोशल मीडियापासून लांब होती. पतीच्या निधनानंतर मंदिराचं आयुष्य जसं वर खाली झालं होतं. मात्र, आता मंदिरा या सगळ्यानंतर हळू हळू पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करत आहे. मंदिराने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मंदिरा आनंदी असल्याचे दिसतं आहे.

मंदिराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत मंदिराने वर्कआऊटचे कपडे परिधान केले आहे. तर हा फोटो वर्कआऊटनंतरचा आहे. हे फोटो शेअर करत ‘जेव्हा माझी लहान मुलगी वर्कआऊटनंतर मला हसायला सांगते. तेव्हा एंडोर्फिन त्याचे काम करते तर मी नाही कसं बोलू शकते?’ यासोबतच मंदिराने एक नवीन सुरुवात असल्याचे सांगत #beginagain हे हॅशटेग वापरले आहे.

आणखी वाचा : ‘एक आई म्हणून विनंती करतेय…’; राज कुंद्रा प्रकरणी शिल्पा शेट्टीनं मांडली भूमिका

 

View this post on Instagram

 

A post shared by Mandira Bedi (@mandirabedi)

आणखी वाचा : नेटकऱ्याने विचारले ‘तू व्हर्जिन आहेस का?’ सलमानचे उदाहरण देत टायगर म्हणाला..

मंदिरा सोशल मीडियावर तिच्या कुटुंबाचे फोटो शेअर करताना दिसते. ३० जून रोजी मंदिराचा पती राज कौशल यांचे निधन झाले. या घटनेमुळे फक्त मंदिरा नाही तर तिच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. राजला या आधी कोणत्याही प्रकारची त्रास नव्हते.