करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. संपूर्ण जगात पसरलेल्या या प्राणघात विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. अनेक मोठमोठे सेलिब्रिटी देखील या करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सर्दी खोकल्याचा त्रास जाणवत असल्यामुळे अभिनेत्री मनिषा कोईराला हिने देखील स्वत:ची करोना चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मनिषाने ट्विटच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना सांगितली आहे.

सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी मोदींना पाठवा हा मेसेज; सुशांतच्या बहिणीचं आवाहन

“तुमच्याकडे फाटलेले कपडे असतील तर सारा अली खानला द्या”, अभिनेत्याचं अजब आवाहन

करोनाला हरवण्यात भारतीय अव्वल

जागातील इतर देशांच्या तुलनेत करोनाच्या संसर्गात भारत वेगाने पुढे जात असल्याने निर्माण झालेली चिंतेच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांत ९०,००० रुग्ण बरे झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या सलग तीन दिवसांच्या आकडेवारीमुळं भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

मंत्रालयानं म्हटलं, भारतानं एक महत्वाचा टप्पा ओलांडला असून देशाचा राष्ट्रीय करोना रिकव्हरी रेट हा ८० टक्क्यांच्यापुढे गेला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. गेल्या तीन दिवसांत भारतात ९०,००० पेक्षा जास्त करोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षा अधिक आहे. तर उर्वरित १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील रिकव्हरी रेट ७९ टक्के आहे. आज एकूण बरे झालेले रुग्ण ४४ लाखांच्या (४३,९६,३९९) जवळपास आहेत. त्यामुळे जगातील एकूण बरे होण्याऱ्या रुग्णांच्या संख्येत भारत अव्वल स्थानी आहे. जगातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी १९ टक्क्यांहून अधिक आहे.