News Flash

मुलगी दत्तक घेण्याची मनिषा कोइरालाची इच्छा

कर्करोगाला यशस्वी लढा देणा-या अभिनेत्री मनिषा कोईरालाला मुलगी दत्तक घेण्याची इच्छा आहे.

| April 14, 2014 12:41 pm

कर्करोगाला यशस्वी लढा देणा-या अभिनेत्री मनिषा कोईरालाला मुलगी दत्तक घेण्याची इच्छा आहे. मात्र, या आजाराच्या पुनरावृत्तीच्या भयावर मात केल्यावरचं आपण मुल दत्तक घेऊ असे तिचे म्हणणे आहे.
बॉम्बे, १९४२-अ लव्ह स्टोरी, दिल से यांसारख्या चित्रपटातील अभिनयाकरिता ओळखल्या जाणा-या ४४ वर्षीय मनिषा कोइरालाला २०१२साली गर्भशयाचा कर्करोगाने ग्रासले होते. मनिषाने नुकतेच ट्विटरवर पोस्ट केले होते की, एक दिवस मी हा आजार मला पुन्हा बळावणार नाही या भीतीवर मात करेन आणि मुल दत्तक घेईन. तोपर्यंत, स्वतःचे कुटुंब असणे हे माझे मोठे स्वप्न आहे. मनिषाने १९९१ साली प्रदर्शित झालेल्या सौदागर चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने मनी रत्नम, राम गोपाल वर्मा, विधू विनोद चोप्रा आणि राज कुमार संतोषी या मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 12:41 pm

Web Title: manisha koirala wants to adopt a baby
टॅग : Entertainment News
Next Stories
1 ‘रिव्हॉल्व्हर रानी’ पाहिल्यावर माझ्याशी कुणी लग्न करणार नाही- कंगना
2 सनी लिऑन करणार ‘स्प्लिट्सव्हिला’ रियालिटी शोचे सुत्रसंचालन
3 ‘भूतनाथ रिटर्न्स’चा तीन दिवसांत १८.०२ कोटींचा गल्ला
Just Now!
X