News Flash

उर्मिला- आदिनाथ कोठारेला कन्यारत्न

पहिलं बाळ हे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अनुभव घेऊन येतं

उर्मिला कोठारे, आदिनाथ कोठारे

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांना कन्यारत्न झाले आहे. आदिनाथने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगी झाल्याची गोड बातमी दिली. काही दिवसांपूर्वी उर्मिलाच्या डोहाळे जेवणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. उर्मिला आणि आदिनाथ दोघंही सोशल मीडियावर सक्रीय असल्याने त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण ते आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्यामुळेच आदिनाथने तो बाबा झाल्याची बातमीही सोशल मीडियावरूनच त्यांच्या चाहत्यांना दिली.

पहिलं बाळ हे प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात नवे अनुभव घेऊन येतं. उर्मिला सातत्याने गरोदरपणातले व्यायाम आणि त्यासंबंधी निगडीत अनेक व्हिडिओ शेअर करायची. काही दिवसांपूर्वी तर तिने डबस्मॅशवर ‘बेबी को बेस पसंत है’ या गाण्यावर नाचताना एक व्हिडिओ शेअर केला होता.

एका सिनेमाच्या निमित्ताने उर्मिला आणि आदिनाथची पहिल्यांदा भेट झाली होती. दोघांची प्रेमकथाही चांगलीच मजेशीर आहे. ‘शुभ मंगल सावधान’ हा उर्मिलाचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात ती मुख्य भूमिकेत होती तर आदिनाथ या सिनेमाचा सहाय्यक दिग्दर्शक होता. त्याचे वडील म्हणजेच महेश कोठारे यांना तो असिस्ट करत होता. सिनेमाशी निगडीत कामास्तव उर्मिला आदिनाथच्या घरी गेली होती. तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. या सिनेमाच्या सेटवर त्या दोघांची मैत्री झाली. सिनेमाचे चित्रीकरण संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटू लागले. पुण्यात एका कॉफी शॉपमध्ये आदिनाथने उर्मिलाला प्रपोज केलं होतं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २० डिसेंबर २०११ मध्ये दोघेही विवाहबद्ध झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2018 4:47 pm

Web Title: marathi actor actress adinath and urmila kanitkar kothare blessed with baby girl photos news
Next Stories
1 सरस्वती आणि देवाशिषचं लग्न होणार?
2 घटस्फोटानंतर हृतिक-सुझान पुन्हा करणार लग्न?
3 ‘या’ महिला स्टार टेनिसपटूच्या आयुष्यावर रोहित शेट्टी साकारणार बायोपिक?
Just Now!
X