लॉकडाउनच्या काळात सारं काही बंद असल्यामुळे सहाजिकच चित्रपटगृह, नाट्यगृहदेखील बंद आहेत. त्यामुळे अनलॉक झाल्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहापर्यंत कसं आणायचं हा प्रश्न दिग्दर्शक, निर्मात्यांसमोर आहे. मात्र, प्रेक्षकवर्ग जर हवा असेल तर चित्रपट करताना कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी हे महेश कोठारे यांनी सांगितली आहे.

दरम्यान, मराठी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट केल्यानंतर महेश कोठारे यांनी त्यांचा मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवला आहे. आतापर्यंत त्यांनी जय मल्हार, श्री गणेशा, दख्खनचा राजा ज्योतिबा अशा अनेक मालिकांची निर्मिती, दिग्दर्शन केलं आहे.