देशावर ओढावलेल्या करोनाच्या संकटाला सारेच कंटाळले आहेत. दररोज या करोनाविषयी वेगवेगळ्या चर्चा नागरिकांमध्ये रंगत असतात. मात्र या संकटावर मात करायची असेल तर सगळ्यांनी घरात राहून प्रशासनाची मदत करणं गरजेचं आहे. सरकार जे आदेश देतंय त्याचं योग्यरित्या पालन करणं आवश्यक आहे. यामध्ये अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडेने ट्विट करत ‘करोनाच्या या गनिमाला घराच्या सीमेवरच हरवायचं आहे’, अशा आशयाचं एक ट्विट केलं आहे.

प्रवीण तरडे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर व्यक्त होत असतात. काही दिवसापूर्वी तो वांद्रे स्थानकावर घडलेल्या घटनेवर व्यक्त झाला होता. त्यानंतर आता करोनाचा सामना कसा करायचा हे सांगितलं आहे.

‘महाराष्ट्र गेली हजारो वर्षं गनिमांशी लढतच आलाय ..आता गनिम कोरोनाच्या रूपात आलाय त्याला कसा ठेचायचा हे आम्हा शिवबाच्या लेकरांना चांगलच ठाऊक आहे .. हा गनिम सीमेवर जावून नाही तर घराच्या सीमेत राहून ठोकायचाय ..’, असं ट्विट प्रवीण तरडेने केलं आहे.

दरम्यान, या ट्विटच्या माध्यमातून त्याने जनतेला घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. करोनाशी लढा द्यायचा असेल तर घरातच रहा कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका असला सल्ला त्याने दिला आहे.