सध्या देशावर येणाऱ्या विविध संकटांवर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणा सज्ज झाली आहे. या संकटांचा सामना करण्यासाठी नागरिकांमध्ये धैर्याची गरज आहे, सकारात्मक दृष्टीकोनाची गरज आहे. हाच सकारात्मक दृष्टीकोन ठेवत अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने एक कविता लिहिली आहे. ‘ये राष्ट्र पुन: खडा होगा..’ असे या कवितेचे बोल असून सोशल मीडियावर त्याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
“जे घरबसल्या तुम्ही पाहताय, ते मी पण पाहतोय. आधी करोना आला, मग अम्फान वादळ आलं, मग आता निसर्ग आहे, तिकडे सीमेवर चीन बसलाच आहे. देशाच्या मागे या सगळ्या गोष्टी एकदम अशा का येतायत हे कळत नाहीये. पण हे सगळं घडत असताना मनात एक विचार सतत येतोय की ये राष्ट्र पुन: खडा होगा,” असं तो या व्हिडीओच्या सुरुवातीला म्हणतोय.
आणखी वाचा : राजकारणात प्रवेश करणार का?; सोनू सूद म्हणतो..
संकर्षणची ही प्रेरणादायी कविता नेटकऱ्यांना पसंत पडली असून अनेकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 3, 2020 1:04 pm