News Flash

यंदाचा गणेशोत्सव साधेपणानेच – सारंग साठ्ये

यंदा सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत आहे

प्रतिनिधी

करोना संकटाच्या काळात आज गणपत्ती बाप्पांचं आगमन झालं आहे. त्यामुळे सर्वत्र चैतन्याचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. म्हणूनच या काळातही प्रत्येक गणेशभक्तांच्या चेहऱ्यावर आनंदाचं दिसून येत आहे. परंतु, यंदा सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने हा दिवस साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला आहे. यात अभिनेता सारंग साठ्येनेदेखील यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याचं म्हटलं आहे.

“यंदा करोनामुळे सुरक्षेचे नियम पाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार आहे. भाडिपाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत हाच संदेश पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘यंदाचा गणपती घरच्या घरी’ या विषयाला धरून आम्ही भाडिपाचे तीन भाग चित्रित केले आहेत. त्यातील ‘आई आणि मी’ या मालिकेत आम्ही शेजारचं एक कुटुंब दाखवलं आहे. गणपतीत करोनामुळे शेजारी राहणारं कुटुंब कसं मदत करतं हा विषय केंद्रस्थानी ठेवून हा भाग केला आहे. आमच्या टीममधील काही सदस्य हे गणपतीनिमित्त कोकणात गेल्याने तिथून काम करत आहेत. त्यामुळे भाडिपाचं काम सांभाळत दोन दिवस पुण्यात घरच्या गणपतीला जाईन. आमच्या घरी पाच दिवसांचा गणपती असतो. दोन दिवसांच्या सुट्टीनंतर गणपतीचा आशीर्वाद घेऊन मी पुन्हा जोमाने काम करणार आहे”, असं अभिनेता सारंग साठ्ये म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “गणेशोत्सवात ढोल-ताशा पथकांना अनन्यसाधारण महत्त्व असतं. पुण्यात गणेशोत्सवाचे वेध लागले की, नदीकाठी अनेक ढोल-ताशा पथकांचा सराव सुरू होतो. घरी असल्यास मी आवर्जून या सरावांना हजेरी लावतो. मात्र, यंदा तो उत्साह, लगबग यांची उणीव जाणवेल. लहानपणी गणेशोत्सवाची आम्ही आतुरतेने वाट पाहायचो. शाळेला सुट्टी लागल्यावर कर्वेनगरमधल्या सोसायटीतल्या गणपतीसाठी आरास करायचो. पानं, फुलं, टाकाऊपासून टिकाऊ अशी पर्यावरणपूरक सजावट करण्यावर आमचा भर असे. माझी आई उकडीचे मोदक उत्तम करते. करोनामुळे यंदा अनेक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं आहे. मला हा निर्णय अतिशय योग्य वाटतो”.

सौजन्य : लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2020 8:57 am

Web Title: marathi actor sarang sathaye on ganesh chaturthi ssj 93
टॅग : Ganeshotsav
Next Stories
1 ‘करोनाचे संकट टळू दे’; श्रेया बुगडेची बाप्पाला विनवणी
2 ‘एक दिवस अचानक उठून…’, आलियाचे घराणेशाहीवरील वक्तव्य पुन्हा चर्चेत
3 रियासोबतचं व्हॉट्सअॅप चॅट समोर येताच महेश भट्ट झाले ट्रोल
Just Now!
X