News Flash

‘या’ मराठी अभिनेत्याच्या घरी झालं नव्या पाहुण्याचं आगमन

सोशल मीडियावर शेअर केली गोड बातमी

अभिनेता श्रीकर पित्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याने आपल्या चाहत्यांना नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

श्रीकर नुकताच बाबा झाला आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून आपल्याला मुलगा झाल्या असल्याचं कळवलं आहे. “आम्हाला मुलगा झाला आहे. जो आम्हाला मदर्स डे आणि फादर्स डेच्या शुभेच्छा देईल अशा पाहुण्याचं स्वागत करण्यास आम्हाला आनंद होत आहे”, अशा कॅप्शनसह त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrikar Pitre (@shrikarpitre)


यात त्याने आपली पत्नी पूर्वा सारस्वत हिलाही आपल्या फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं आहे.  श्रीकर मराठी रंगभूमीवरचा एक सुपरिचित अभिनेता आहे. त्याने काही बालनाट्यांमध्येही काम केलं आहे. ‘जंबा बंबा बू’ हे त्याचं बालनाट्य बरंच चर्चेत आहे. त्याने अनेक मराठी मालिकांमधून काम केलं आहे. ‘ती फुलराणी’, ‘लव लग्न लोचा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ अशा काही मराठी मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. ‘चुभन’, ‘इश्क वाला लव्ह’ अशा काही चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे.  तो कायम आपल्या वर्कआऊटचे व्हिडिओज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 3:46 am

Web Title: marathi actor shrikant pitre blessed with a baby boy vsk 98
Next Stories
1 ताहिरा कश्यपचा मुलांसोबतचा महिला दिन
2 सनीचे पॉर्न फिल्ममध्ये पर-पुरूषासोबत काम करणे डॅनियलला नव्हते पसंत म्हणून..
3 आलियाचा भावनिक संदेश; रणबीर कपूरला करोनाची लागण झाल्यानंतरच्या धीराच्या गोष्टी
Just Now!
X