News Flash

शुभंकर तावडे करणार ‘दिल दोस्ती दुनियादारी’; साकारणार ‘ही’ भूमिका

जाणून घ्या, शुभंकर तावडेच्या आगामी चित्रपटाविषयी

‘कागर’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता शुभंकर तावडे त्याच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. शुभंकर लवकर ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं पुण्यात चित्रीकरण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. कणखर, निडर अशा भूमिका साकारणारा शुभंकर रोमॅण्टीक रुपात प्रेक्षकांसमोर यावा अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. त्यामुळे चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या चित्रपटामध्ये शुभंकर एका रोमॅण्टिक अंदाजात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

“लॉकडाउननंतर पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. मी सेटवर जाणार आहे त्यामुळे फारच उत्सुकता आहे सगळ्या गोष्टींची. मात्र, या काळात नक्कीच सगळ्यांची काळजी आणि योग्यती खबरदारीदेखील बाळगणार आहे. तसंच न्यू नॉर्मलसाठी आम्ही मानसिकरित्या तरी तयार झालो आहोत. त्यामुळे सेटवरदेखील अगदी मोजकीच टीम असणार आहे. परंतु, या सगळ्या परिस्थितीचा चित्रपटावर किंवा सादरीकरणावर कोणताही परिणाम होणार नाही याकडे आमचं विशेष लक्ष असणार आहे”, असं शुभंकर म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “दिल दोस्ती दुनियादारी या चित्रपटात मी तरुण या युवकाची भूमिका साकारत आहे. तो कवी, गायक आणि गिटारिस्ट आहे. या तरुणला एक रॉकस्टार व्हायचं आहे, त्याला मोठे स्टेज शो करायचे आहेत. अशी ही एकंदरीत भूमिका आहे”.

दरम्यान, ‘कागर’प्रमाणेच शुभंकरची ‘काळे धंदे’ ही वेब सीरिजदेखील तितकीच गाजली होती. उत्तम अभिनयामुळे शुभंकर हे नाव आता प्रत्येक घराघरात पोहोचलं आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता असल्याचं दिसून येतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 3:27 pm

Web Title: marathi actor shubhankar tawde new marathi movie dil dosti duniyadari ssj 93
Next Stories
1 शाहरुख खानला मारलं म्हणून गुलशन ग्रोव्हर यांना ‘या’ देशाने नाकारला व्हिसा
2 मी सावळी असल्याचा मला मनस्वी आनंद : चित्रांगदा
3 “तुम्ही मास्क वापरणारच नव्हता ना?”; करोना पॉझिटिव्ह ट्रम्प यांची अभिनेत्रीने उडवली खिल्ली
Just Now!
X