News Flash

‘चॉकलेट बॉय’च्या भूमिकेला छेद देत स्वप्नील जोशी नव्या रुपात

या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्यात येणार आहे

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्नील जोशी सध्या त्याच्या भूमिकांविषयी सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याची चॉकलेट बॉय म्हणून निर्माण झालेल्या ओळखीला तो छेद देण्याचा प्रयत्न करत असून सध्या विविधांगी भूमिकांची निवड करताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या आगामी चित्रपटातही तो थोडासा आगळ्यावेगळ्या रुपात दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाची कथाही थोडीशी हटके असणार आहे. नुकताच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून स्वप्नीलने हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

स्वप्नीलची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘बळी’ असं असून या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय मांडण्यात येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन ‘लपाछपी’ फेम विशाल फुरिया करत आहेत. तर निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार हे करत आहेत.

‘बळी’ या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये एक क्रॉस दिसत असून काहीतरी गंभीर घडते आहे, असे त्यातून प्रतीत होते. हा चित्रपट २०२० साली प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हे पोस्टर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कथेविषयी आणि स्वप्नील नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार याविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


“यंदाच्या वर्षी प्रगल्भ मराठी प्रेक्षकांनी चित्रपटांच्या नवनवीन प्रकारांना पाठबळ दिले आणि आपलेसे केले. त्यातील माझे एक छोटे योगदान म्हणून या चित्रपटाच्या माध्यमातून मी हॉरर चित्रपटांच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. हा चित्रपट मला माझ्या आवडीच्या लोकांबरोबर करायची संधी मिळत असल्याचा अधिक आनंद मला आहे. कार्तिक आणि अर्जुन हे निर्माते आणि विशाल हे दिग्दर्शक, ही या क्षेत्रातील माझी आवडती माणसे आहेत. आमची ही टीम प्रेक्षकांना चांगलीच ‘घाबरवून’ सोडेल, याची मला पूर्ण खात्री आहे,”असं स्वप्नील म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 2:32 pm

Web Title: marathi actor swapnil joshi new marathi movie bali ssj 93
Next Stories
1 सलमानसोबतच्या ‘या’ लहानगीला ओळखलंत का?; ‘दबंग ३’मधून करतेय पदार्पण
2 T20 World Cup 2020 : करिना कपूरच्या हस्ते विश्वचषकाचं अनावरण
3 ‘बाळासाहेब! तुम्ही ज्या मराठी मुलांसाठी भांडलात त्यांना कामच करायचं नाही’
Just Now!
X