प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘AB आणि CD’ या आगामी मराठी सिनेमाचा मुहुर्त सोहळा नुकताच पार पडला. अमिताभ बच्चन या सिनेमात दिसणार आहेत ही आनंदाची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. अमिताभ बच्चन मराठी सिनेमात दिसणार याचा आनंद जितका मराठी प्रेक्षकांना झाला आहे तितकाच आनंद या सिनेमात त्यांच्यासोबत काम करणा-या कलाकारांना देखील झाला. ‘AB आणि CD’ या सिनेमात बिग बींसोबत मराठी कलाकारांची फौज झळकणार आहे.

नाटक, मालिका, सिनेमा या तिन्ही माध्यमात उत्तम काम करून त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम लक्षात ठेवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर त्यांच्या सोबतीला गेल्या वर्षी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्राकडून प्रचंड प्रेम मिळवणारा अभिनेता सुबोध भावे, सुंदर अशी अभिनेत्री सायली संजीव आणि अचूक कॉमेडी टायमिंगने प्रत्येकाला हसवणारा अक्षय टंकसाळे पण महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. ब-याच वर्षांनी सायलीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तिचा चाहता वर्ग नक्कीच आतूर असेल. या सिनेमात बिग बी विक्रम गोखले यांच्या मित्राच्या भूमिकेत दिसतील. त्यामुळे अमिताभ बच्चन आणि विक्रम गोखले यांच्यातील ऑनस्क्रीन मैत्री पाहायला वेगळीच मजा येणार आहे.

वाचा : माधव देवचकेनं अभिजीत बिचुकलेला दिला घरातील सदस्यांना स्पर्श न करण्याचा सल्ला

या सिनेमाची गोष्ट काय असेल हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.