News Flash

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी साजरा केला वसुंधरा दिन; घरासमोरील अंगणात वृक्षारोपण

त्यांच्या ग्रीन डोअर या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद

सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे या सोशल मिडीयावर चांगल्याचं सक्रिय असतात. त्यांनी त्यांच्या ग्रीन डोअर या उपक्रमा अंतर्गत आज त्यांच्या घरासमोरील अंगणात वृक्षारोपण करत वसुंधरा दिन साजरा केला आहे. त्यांनी झाडे लावतानाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मिडीयावर शेअर केला आहे. यात त्यांनी ग्रीन डोअर या उपक्रमा अंतर्गत झाडे का लावावीत आणि कशा पद्धतीने झाडांची जोपासना करावी याबद्दल माहिती दिली आहे.

अश्विनी भावे यांनी व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि वृक्षारोपण केलं आहे.

अश्विनी भावे यांनी अमेरीकेत त्यांच्या घरासमोरील बागेत वेगवेगळी फळं, फुलं आणि भाज्यांची बाग फुलवली आहे. त्या रोजच्या जेवनातही त्या भाज्यांचा वापर करतात. निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे पटवून देण्यासाठी त्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या ग्रीन डोअर या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Loksatta (@loksattalive)

अश्विनी भावे यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘सरकारनामा’, ‘कळत नकळत’, ‘कदाचित’, ‘मांजा’ अशा एकाहून एक सुपरहीट सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 4:06 pm

Web Title: marathi actress ashwini bhave wish world earth day planting vegetables in backyard kpw 89
टॅग : Entertainment
Next Stories
1 ‘एक पल का जीना’वर आशा भोसले यांनी केला हृतिकसारखा डान्स
2 सनी लिओनीच्या मुलीला पाहून नेटकरी म्हणाले; “लहान असून निशा किती…”
3 “जरा तरी जबाबदारीने वागा….”, फोटोग्राफर्सवर वरुण संतापला!
Just Now!
X