मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या नवनवीन कलाकार पदार्पण करत असून दिप्ती धोत्रे असंच एक नाव आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नव्याने पदार्पण केलेल्या दिप्तीने आतापर्यंत काही चित्रपटांमध्ये काम केलं असून तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.

‘डोंब’,‘धारा ३०२’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकांनंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘मी शिवाजी पार्क’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मधून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे दिप्तीने चित्रपटसृष्टीमध्ये तिचं स्थान निर्माण करण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे.

Yanda Kartavya Aahe fame smita shewale what does do now
‘यंदा कर्तव्य आहे’ सिनेमाला १८ वर्षे पूर्ण! या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सध्या काय करते? जाणून घ्या
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Narayani Shastri family
पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

‘मला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि या क्षेत्राबद्दल आकर्षणही होते, याच ओढीने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. सुरुवातीला एडिटर म्हणून काम केल्यानंतर अभिनयाची संधी चालून आली. वेगवेगळ्या चित्रपटांतून मला वैविध्यपूर्ण भूमिका साकारायला मिळणं ही माझ्यासाठी खरंच मोठी अचिव्हमेंट आहे. मला विश्वास आहे की, मी साकारत असलेल्या भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडतील, असं दिप्ती म्हणाली.

दरम्यान, दिप्ती लवकरच ‘सर्वनाम’, ‘भोंगा’, भिरकीट’ या आगामी चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तसेच आगामी ‘विठ्ठल’ चित्रपटातही तिच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आणखी बऱ्याच चित्रपटांमध्ये दिप्तीच्या अभिनयाचे रंग दिसणार आहेत.