News Flash

रसिका सुनीलची नवी झेप; व्हिडीओ पाहून चाहते थक्क

हेलिकॉप्टर प्रशिक्षणाचा व्हिडीओ केला शेअर

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनिल हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. रसिका सोशल मीडियावरही चांगलीच अ‍ॅक्टीव्ह असते. ग्लॅमर आणि बोल्ड फोटो शेअर करत ती चाहत्यांना भुरळ घालताना दिसते.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील कलाकार मात्र प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. रसिकाने साकारलेली शनाया ही भूमिका तर चाहत्यांच्या कायमचं लक्षात राहिल अशी होती. या मालिकेत रसिकाने नकारात्मक भूमिका साकारल्याने सुरुवातीला प्रेक्षकांच्या टीकेची ती धनी ठरली. मात्र कालांतराने तिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मालिका संपल्यानंतर रसिका सध्या सुट्टी एन्जॉय करतेय.

रसिकाने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हेलिकॉप्टर चालवण्याचं प्रशिक्षण घेत असतानाचा व्हिडीओ रसिकाने शेअर केला आहे. ” जेव्हा मी विमान उड्डाणंचे धडे घेत होते.” असं कॅप्शन रसिकाने तिच्या व्हिडीओला दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

रसिकाच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून मोठी पसंती मिळतेय.चाहत्यांसोबतच अनेक कलाकालांनीदेखील कमेंट करत रसिकाचं कौतुक केलं आहे.

दोन वर्षांपूर्वी रसिकाने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. यावेळी अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. याच वेळी तिने हेलिकॉप्टर उड्डाणाचं प्रशिक्षण घेतलं होतं. तेव्हाचा व्हिडीओ रसिकाने शेअर केला आहे. तसचं याचवेळी तिची आणि आदित्य बिलागीची भेट झाली होती. त्यनंतर रसिकाने ती आदित्य बिलागीला डेट करत असल्याचं स्पष्ट केलं होतं. शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर रसिका पुन्हा एकदा शनायाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. दरम्यानच्या काळात ईशा केसकरने शनायाची भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 11:17 am

Web Title: marathi actress rasika sunil share video of learning helicopter flying kpw 89
Next Stories
1 कभी कभी, सिलसिला या चित्रपटांचे कथाकार सागर सरहदी काळाच्या पडद्याआड
2 भाईजानचा बच्चेकंपनीसोबत धमाल डान्स; व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
3 पापा ऑन ड्यूटी; विरुष्काचे एअरपोर्टवरील फोटो व्हायरल
Just Now!
X