News Flash

लग्नानंतर शर्मिष्ठा राऊतचं पहिलं हळदीकुंकू; पाहा फोटो

पाहा, शर्मिष्ठाच्या हळदीकुंकवाचे खास फोटो

लग्नानंतर शर्मिष्ठा राऊतचं पहिलं हळदीकुंकू; पाहा फोटो

जानेवारी महिना आला की सगळ्या स्त्रियांना वेध लागतात ते संक्रांतीच्या हळदी कुंकूवाचे. त्यातच जर का लग्नानंतर पहिलीच मकरसंक्रांत असेल तर मग नववधूंचा थाट काही विचारायलाच नको. हलव्याचे दागीने, काळ्या रंगाची साडी आणि पारंपरिक साजशृंगार या सगळ्यात नववधूचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. विशेष म्हणजे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतनेदेखील तिचं पहिलं मकरसंक्रांतीचं हळदीकुंकू केलं असून त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने अलिकडेच तेजस देसाईसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे लग्नानंतर ती सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या हनिमूनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता हळदीकुंकवाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharmishtha Raut (@sharmishtharaut)

शर्मिष्ठाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाची साडी नेसली असून त्यावर हलव्याचे दागीने परिधान केले आहेत. विशेष म्हणजे तेजसनेदेखील शर्मिष्ठाप्रमाणेच काळ्या रंगाचा कुर्ता आणि हलव्याचा गळ्यातील हार घातला आहे.

दरम्यान, या हळदीकुंकू समारंभाला कलाविश्वातील काही लोकप्रिय अभिनेत्रींना आमंत्रण देण्यात आलं होतं. यात अभिनेत्री मेघा धाडेनेदेखील आल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 9:26 am

Web Title: marathi actress sharmishta raut after marriage first haldi kunku ssj 93
Next Stories
1 ‘जलीकट्टू’ ऑस्करमधून बाद
2 ‘मला अक्षय, शाहिद, हरमन, शाहरुख बद्दल…’, अभिनेत्याला वाचायचे प्रियांकाचे पुस्तक
3 ६ वर्षांनंतर ‘या’ चित्रपटात टायगर आणि क्रिती दिसणार एकत्र
Just Now!
X