मराठी चित्रपट सृष्टीतली आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनाली कुलकर्णी संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहे. सोशल मीडियावरही सोनालीचे लाखो चाहते आहेत. तिच्या विविध फॅशन फोटोंना सोशल मीडियावर हजारो लाईक्स मिळतात. काही महिन्यांपूर्वी सोनाली कुलकर्णीचा दुबईत साखरपुडा पार पडला. २ फेब्रुवारी रोजी कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आपल्या परिवारातील सदस्यांसोबत हा सोहळा पार पडला. सोनालीने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावरुन हे सरप्राईज दिलं होतं.
सोनालीचे नथ आणि साडीतले खास फोटो पाहिलेत का ?? – अप्सरेचा नथीचा नखरा
आज सोनालीच्या साखरपुड्याला सहा महिने पूर्ण होत आहेत. या निमीत्ताने सोनालीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याने आपल्याला कसं प्रपोज केलं याबद्दलची एक गोड आठवण सोशल मीडियावर शेअर केली आहे. सोनालीच्या या फोटोलाही सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सोनाली ही दुबईमध्येच आहे. या काळात कुणालसोबत किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना, किंवा दुबईतील स्थानिक हॉटेलमध्ये भेट देतानाचे अनेक व्हिडीओ सोनाली सोशल मीडियावर शेअर करत असते.