अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेने आयोजित केलेल्या दिवंगत लक्ष्मण देशपांडे एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नाटय़ परिषदेच्या शाखांतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेत नाशिक शाखेने सादर केलेल्या ‘कस्टम केअर’ एकांकिकेला पहिला क्रमांक मिळाला आहे. १५ हजार रुपये रोख आणि प्रशिस्तपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

दुसरा आणि तिसरा क्रमांक अनुक्रमे ‘नथिंग टू से’ (चिंतामणीनगर) व ‘क्षितिजाच्या पलीकडे’ (महानगर नागपूर) यांना मिळाला आहे. पुरस्काराची रक्कम अनुक्रमे ११ हजार व ८ हजार रुपये रोख व प्रशिस्तपत्र अशी आहे. तळेगाव-दाभाडे शाखेने सादर केलेल्या ‘द कॉन्शस’ या एकांकिकेला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.
अभिनयासाठी (पुरुष कलाकार) नीलेश सूर्यवंशी (कस्टम केअर-नाशिक), डॉ. अभय कुलकर्णी (नथिंग टू से-चिंतामणीनगर), प्रणव जोशी (द कॉन्शन्स, तळेगाव-दाभाडे) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला आहे.
अभिनयासाठी (स्त्री कलाकार) पायल पांडे (नथिंग टू से-चिंतामणी नगर), पूजा पिंपळकर (क्षितिजाच्या पलीकडे) (महानगर नागपूर) व करिष्मा देसले (कस्टम केअर, नाशिक) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक
मिळाला.
अन्य पारितोषिके अशी (प्रथम, द्वितीय व तृतीय या क्रमाने) दिग्दर्शन- प्रताप सोनाळे (नथिंग टू से), बाळकृष्ण तिडके (कस्टम केअर), नलिन बनसोड (क्षितिजाच्या पलीकडे) नेपथ्य-चंद्रकांत आडकर, गुलाब पवार (कस्टम केअर), करण यादव (नथिंद टू से), जितेंद्र गिरी (क्षितिजाच्या पलीकडे)याबरोबरच पाश्र्वसंगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, लेखन आणि अभिनय (उत्तेजनार्थ) या गटातही पारितोषिके जाहीर झाली आहेत.