मराठी चित्रपटांच्या इतिहासात राजकीय चित्रपटांचा विषय आला की प्रत्येकाच्या ओठांवर ‘सामना’ आणि ‘सिंहासन’ या दोन चित्रपटांचीच नावं सर्वप्रथम येतात. मग त्यानंतर ‘सरकोरनामा’, ‘शासन’, ‘रणभूमी’, ‘साहेब’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, ‘झेंडा’, ‘गणपतराव गावडे’ हे आणि असे कितीतरी चित्रपट मराठीत येऊ न गेले ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष राजकीय विषयांना हात घातला. परंतु, गेली कोही वर्षे राजकीय अंगाने जाणारा एक ही चित्रपट मराठीत आला नाही. अर्थात, असे चित्रपट क रणं म्हणजे धाडस आणि जोखीम अशा दोन्ही गोष्टी समांतर स्वीकाराव्या लागतात. असेच काहीसे धाडस करून ग्रामीण राजकारणावर भाष्य क रणारा ‘धुरळा’ हा चित्रपट नवीन वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

सध्या वाहिन्यांवर झळक णाऱ्या ट्रेलरमधून चित्रपटातील पात्रांची आणि आशयाच्या धुरळ्याची कल्पना प्रेक्षकोंना आलीच आहे. परंतु एकाच चित्रपटात अनेक  मोठे चेहरे पाहण्याचा योग ‘दुनियादारी’नंतर थेट आता ‘धुरळा’च्या निमित्ताने प्रेक्षकांच्या वाटय़ाला येणार आहे. राजकीय चित्रपटांचे संवाद, पात्र आपण कायमच वास्तवाशी जोडू पाहात असतो. त्यामुळे संहिता साकारताना लेखकाला असलेले सद्य:स्थितीचे भान आशयाला अधिक च जिवंत करते. याविषयी चित्रपटाचे लेखक  क्षितिज पटवर्धन सांगतो, ग्रामीण राजकारणाची गणिते ही सर्वसामान्य राजकीय विचारांना छेद देणारी असतात. त्यातही ग्रामीण भागावर पडलेल्या शहरीक रणाच्या प्रभावामुळे तिथल्या घराघरांत राजकीय खलबतं सुरू असतात आणि ही गंमत प्रेक्षकांपुढे मांडायला हवी या विचाराने चित्रपटाची संहिता लिहिली गेली. अशा संहिता घरात किंवा आलिशान ठिकाणी बसून लिहिता येत नाहीत. त्यासाठी त्या त्या गावांमध्ये जाऊ न तिथले अनुभव घ्यावे लागतात, असेही तो सांगतो. शिवाय चित्रपटातील पात्रांविषयी क्षितिज सांगतो, ‘धुरळा’मध्ये अनेक  क लाकार एक त्र आले असले तरी त्यांच्या प्रत्येक  पात्राला अर्थ आहे. त्यामुळे पात्रांना असलेले विचार, मर्यादा, स्वभाव, ध्येय यांचा अभ्यास सर्वच क लाकोरांक डून के ला गेला आणि त्यानंतर चित्रपट चित्रीकरणासाठी सज्ज झाला. आधीचा गृहपाठ पक्का असल्याने चित्रीकरणात सहजता आल्याचे त्याने सांगितले.

ज्यांच्या अभिनयाने आजवर संबंध महाराष्ट्राचे डोळे पाणावले आहेत, अशा अभिनेत्री अलका कुबल या चित्रपटात आगळीवेगळी भूमिका साकारताना दिसणार आहेत. रडणे आणि रडवणे या भावनांच्या पलीकडची एक  खंबीर स्त्री म्हणून त्या प्रेक्षकांसमोर येणार आहेत.  ‘आजवर केलेल्या भूमिकांमधून रडणे आणि रडवणे या गोष्टींचा कोहीसा कंटाळा आला होता’, असे त्या गमतीने म्हणतात. ही भूमिका आजवर साकारलेल्या पात्रांपेक्षा खूपच वेगळी असल्याने आव्हान स्वीकारावेसे वाटले. विशेष म्हणजे ती भूमिका मी करावी असे लेखक -दिग्दर्शकांना वाटले त्यामुळे त्यांचे अधिक कौतुक आहे, असे त्या सांगतात.

एको घरात चार लोक असले तर तंटे कोही चुकत नाहीत. त्यात एको चित्रपटात इतके  क लाकोर एकत्र आल्यावर काय होत असेल याची कल्पनाच करवत नाही. पण या चित्रपटाच्या दरम्यान मात्र सर्वच कलाकार एकमेकांकडून शिकत- सावरत पुढे जात होते. आपल्यासोबत इतरांचंही कोम कसं चांगलं होईल याकडे लक्ष देत होते. वयाने आणि अनुभवाने मोठय़ा असलेल्या अलकाताई आणि आम्ही सगळे नवीन कलाकार यांची छान भट्टी जमली होती, असे अभिनेत्री सई ताम्हणकर सांगते.

जेव्हा एको चित्रपटात अनेक  मोठे चेहरे येतात तेव्हा त्यात पुरुष कलाकार अधिक  संख्येने असतात, परंतु या चित्रपटात स्त्री कलाकारांचे वर्चस्व पाहायला मिळते. महाराष्ट्रातल्या राजकोरणातही स्त्रियांचे योगदान आता कुठे वाढू लागले आले. त्यामुळे वास्तवाशी समतोल साधणाऱ्या या संहितेविषयी क्षितिज सांगतो, आजवर राजकीय चित्रपटांमधून दाखवण्यात आलेल्या स्त्रियांची चौक ट वास्तवापेक्षा खूप वेगळी आहे, ज्याचा अनुभव आम्हाला गावागावांमध्ये जाऊ न पाहणी क रताना आला. तिथे लढणाऱ्या, निवणुकीत सामील होणाऱ्या, कोर्यक र्ता म्हणून राबणाऱ्या किं वा सरपंच म्हणून त्या खुर्चीवर बसलेल्या प्रत्येक  स्त्रीला आपल्या गावाविषयी असलेली आस्था जाणवली. तिथे तीन पिढय़ांचं नेतृत्व क रण्याऱ्या स्त्रिया आहेत. कोही चाळीस वर्षे राजकारण जवळून पाहात आहेत, काही तरुण स्त्रिया गावाचा विकास साधू पाहत आहेत, तर कोही नव्या राजकारणात हिरिरीने सहभागी होऊ  पाहत आहेत. अशा स्त्रियांची क था आजवर कु ठेही दाखवण्यात आली नव्हती, ती या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केल्याचे क्षितिज सांगतो.

तर अंकुश चौधरी हा चॉकलेट हिरो या चित्रपटात दादाची भूमिका साकारणार आहे. राजकीय विचारधारा, कृतीमागचे आखीव मनसुबे, आवाजातील जरब, मानमरातब तरीही प्रत्येकोला जोडून ठेवणारा दादा असे अनेक  कंगोरे या पात्राला असल्याचे अंकु श सांगतो. भूमिके त शिरून एक रूप होताना त्या पात्राचा वैयक्तिक आयुष्यावरही प्रभाव पडला, चित्रीक रणानंतर कोही दिवस आपण ‘दादा’च आहोत असाच आविर्भाव माझ्यात आला होता आणि या पात्राचा प्रभाव दैनंदिन आयुष्यवरही कोही कोळ जाणवला, असं तो म्हणतो.

या चित्रपटात सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी तब्बल दहा वर्षांनी एकत्र पती-पत्नीच्या भूमिके त काम करत आहेत. याविषयी सिद्धार्थ सांगतो, सोनालीविषयी माझ्या मनात कोयमच आदरभाव आहे. अनेक  साहाय्यक  भूमिका के ल्यांनतर ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटात मला प्रमुख भूमिको मिळाली आणि त्या चित्रपटाची नायिको सोनाली होती, तिथपासून आजपर्यंत बरेच चित्रपट बरोबर केले. परंतु दहा वर्षांंनी आम्ही पुन्हा एक त्र कोम क रत आहोत याचा प्रचंड आनंद आहे, असं तो सांगतो. तर सोनाली या चित्रपटाची दुसरी बाजू उलगडून सांगते, तिच्या मते हा केवळ राजकीय चित्रपट नाही तर राजकारणात असलेल्या माणसांचे आणि त्यांच्या सोबत चालणाऱ्या माणसांचे भावविश्व लोकांसमोर मांडणार आहे. राजकारणात नाती क शी पणाला लागतात, कुटुंबाची कशी फरफट होते याचं प्रात्यक्षिक  या चित्रपटात दिसेल, असे ती सांगते.

सध्याच्या राजकारणात ज्याप्रमाणे तरुणांचा सहभाग प्रकर्षांने जाणवतो. तसाच याही चित्रपटात एको तरुण कोर्यक र्त्यांची भूमिका बजावणारा अमेय वाघ म्हणतो, कोर्यक र्ता ही अशी ताक द आहे जी समोरच्याला निवडूनही आणू शक ते आणि पाडूही शक ते. कार्यकर्ता हा राजकोरणातील प्यादं नसून वजीर असतो आणि तो कसा हे या चित्रपटातून प्रेक्षकांना कळेल.

ट्रेलर पाहून तरी प्रेक्षकांची उत्सुक ताही बरीच ताणली गेली आहे आणि अपेक्षाही दुणावलेल्या आहेत, याची जाण या चित्रपटातील कलाकार मंडळींना आहे, किंबहुना त्यामुळेच प्रेक्षकांकडून तिकीटबारीवर प्रतिसादाचा धुरळा कसा उडतो, याची उत्सुकता आपल्यालाही असल्याचे ते सांगतात.

चित्रपटाचे नाव जरी ‘धुरळा’ असले तरी हा व्यक्तींमधील विविध रंगांची उधळण करणारा चित्रपट आहे. ‘झी’च्या चित्रपट निर्मितीला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. दहा वर्षांपूर्वी आम्ही ‘नटरंग’ सिनेमाने सुरुवात केली होती आणि यंदा दशक पूर्तीला हा रंगांचा ‘धुरळा’ उडणार आहे. दर्जेदार कलाकार, तगडी संहिता, उत्तम दिग्दर्शन याने बहरलेला हा ‘धुरळा’ महाराष्ट्रातील नकारात्मक  राजकोरणाला छेद देऊ न सकारात्मक  प्रतिमा समोर आणणारा आहे.

मंगेश कुलकर्णी, व्यवसायप्रमुख – झी स्टुडिओ.

‘राजकीय तरीही माणसा-माणसातलं राजकारण’ असा कोहीसा हा चित्रपट आहे. या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी मराठीत राजकीय चित्रपट आला आहे. त्यामुळे यातलं वास्तव जपण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्यासाठी गावागावांमध्ये जाऊ न तिथल्या राजकीय आणि कौटुंबिक  परिस्थितीचा आढावा घेतला. अनुभव आणि अभ्यासातून साकारलेला हा चित्रपट के वळ राजकीय संघर्ष नाही तर नात्याची भावनिकता, नाटय़, विनोद, मनोरंजन असा रंगीत धुरळा आहे. चार ते पाच वर्षे या संहितेवर काम क रताना राजकारणाचे अनेक  पैलू जवळून अभ्यासले. त्यावरून असे लक्षात येते की, राजकारणाविषयी मौन बाळगण्यापेक्षा त्याविषयी व्यक्त होण्याची गरज आहे आणि तोच प्रयत्न ‘धुरळा’च्या माध्यमातून केला आहे.

– समीर विद्वांस, दिग्दर्शक

अभिनयापलीकडे..

अभिनेत्री अलको कुबल यांनी बरीच वर्षे निर्माती म्हणूनही काम केले आहे. पंधरा वर्षांत २०० चित्रपट करण्याचा विक्रमही त्यांनी त्याच कोळात के ला. त्या अनुभवाविषयी अलका कुबल सांगतात, आजसारखी सिनेमागृहं त्या कोळी नव्हती, ना आजसारखी प्रगत यंत्रणा होती. एक  चित्रपट पाच ते सात ठिकाणीच लागत असे. ‘माहेरच्या साडी’सारखा अगदीच गाजलेला चित्रपट असेल तर तो दीडशे- दोनशे सेंटरवर लागत होता. त्यामुळे आर्थिक  बाजू आजसारखी नव्हती. आम्ही गावागावांत जाऊ न जत्रेतल्या तंबूतून सिनेमा दाखवत एकेक सिनेमा पोहोचवला आहे. ‘चित्रपटाची निर्मिती करण्यापेक्षा तो लोकोंपर्यंत पोहोचवणे अधिक  कठीण आहे आणि आजच्या काळात तर ते अधिक च आव्हानात्मक आहे’, असेही त्या सांगतात.

सवयीचे ट्रोलिंग

या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ‘हॅशटॅग पुन्हा निवडणूक ’ असा एक  मजकूर समाजमाध्यमांवर व्हायरल केला गेला. त्याच दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काहीशी अस्थिर होती. तेव्हा सामान्य लोकांप्रमाणेच राजकीय प्रतिनिधीही या ट्रोलिंगमध्ये सहभागी झाले. पुढे चित्रपटाबाबत स्पष्टीक रण आल्यानंतर हा ताण निवळला, परंतु तोवर मात्र माध्यमांवर धुरळा उडाला. या प्रकरणाविषयी सई सांगते, आम्हाला आता ट्रोलिंगची सवय झाली आहे. प्रत्येक  प्रकरणात कलाकारांना गोवण्याची आपल्याकडे पद्धत रूढ  झाली आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचेही सई सांगते.

दिखाव्यापेक्षा कृतीला महत्त्व

कलाकार सामाजिक मुद्दय़ांवर व्यक्त होत नाहीत, यावर सगळेच कलाकार व्यक्तझाले. केवळ समाजमाध्यमांवर व्यक्त होणे म्हणजे सामाजिक  भान नव्हे, किंबहुना अशा व्यक्त होण्याला लोक  अधिक  महत्त्व देतात हे दुर्दैवी असल्याचे मत या सगळ्यांनी व्यक्त केले. मराठीतील प्रत्येक  कलाकार विविध सामाजिक  संस्थांशी जोडला गेला आहे. प्रत्येकजण आपल्या परीने सामाजिक  भान जपतो आहे. ते उघडपणे सांगण्याची आम्हाला गरज वाटत नाही. महाराष्ट्रातील पूरस्थितीत अनेक मराठी कलाकारांनी पुढे येऊन मदत केली. त्यामुळे आम्ही केवळ दिखावा करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीला महत्त्व देतो, असेही या सगळ्यांनी सांगितले.