21 September 2020

News Flash

Video : प्रत्येकाला आपलासा वाटणारा ‘आम्ही बेफिकर’चा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटातून कॉलेज जीवनातील मज्जा पडद्यावर पाहायला मिळणार आहे

कॉलेजची चार-पाच वर्षं म्हणजे अगदी मंतरलेलं जग असतं. मित्र-मैत्रिणी, धमालमस्ती, राडे-भांडणं, प्रेम-प्रेमभंग असा सगळा माहौल या कॉलेजच्या दिवसांत प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. ‘आम्ही बेफिकर’ या चित्रपटातून कॉलेजचं हे जग आता पुन्हा एकदा पडद्यावर अवतरणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यातून या कॉलेज जीवनाचा प्रत्यय येत आहे.
खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधणारा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडणारा हा चित्रपट आहे. त्यामुळेच चित्रपटाचा लुकही यूथफुल असल्याचं आपल्याला ट्रेलरमधून पहायला मिळतं. उत्तम कलाकार, धमाल कथा, चटपटीत संवाद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम असा हा चित्रपट आहे.

हरिहर फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांनी केलं आहे. तर रोहित पाटील याचे सहनिर्माते आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

सुयोग आणि मिताली अनेक मालिका-चित्रपटांतून आपल्यापुढे आले आहेत. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह राहूल पाटील, स्वप्नील काळे आणि अक्षय हाडके यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. प्रणय अढांगळे यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, किर्ती किल्लेदार आणि सौरभ जोशी यांच्या सुमधूर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत. हा चित्रपट येत्या ८ मार्चला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 9:18 am

Web Title: marathi movie amhi befikar trailer out
Next Stories
1 रणवीर सिंग आणि रणबीर कपूर एकत्र काम करणार ?
2 मोदींच्या बायोपिकमध्ये बोमण इराणी साकारणार ‘ही’ भूमिका
3 मिर्झापूर – २ ला हिरवा कंदील
Just Now!
X