News Flash

‘फॅण्ड्री’नंतर सोमनाथ अवघडेचा नवा चित्रपट; पहिल्यांदाच दिसणार नव्या रुपात

जाणून घ्या, सोमनाथच्या आगामी चित्रपटाविषयी

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा २०१३ साली प्रदर्शित झालेला ‘फॅण्ड्री’ हा चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असेल. या चित्रपटात अभिनेता सोमनाथ अवघडे आणि राजेश्वरी खरात या दोघांनी मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. मात्र, या चित्रपटानंतर सोमनाथ अवघडे फारसा कुठे झळकला नाही. परंतु, सोमनाथ लवकरच एका नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

‘फ्री हिट दणका’ या आगामी मराठी चित्रपटात सोमनाथ झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तो पहिल्यांदाच एका आगळ्यावेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अलिकडेच या चित्रपटातील सोमनाथचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे. यात सोमनाथच्या हातात बॅट दिसून येत आहे. त्यामुळे सोमनाथला या नव्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

दरम्यान, ‘फ्री हिट दणका’ हा चित्रपट १६ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असून यात सोमनाथसोबत अभिनेत्री अपूर्वा एस. ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर अरबाज आणि तानाजी ही सैराटमधील मित्रांची जोडीदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुनिल मगरे यांनी केलं आहे. तर, निर्मिती अतुल तरडे आणि आकाश ठोंबरे, मेघनाथ सोरखडे यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 4:11 pm

Web Title: marathi movie fandry fame actor somnath savghade new marathi movie coming soon ssj 93
Next Stories
1 शेतकरी आंदोलन : सोनाक्षी सिन्हाचा आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींना पाठिंबा
2 मतलब कुछ भी! प्रसिद्ध रॅपरने चक्क कपाळावर बसवला हिरा
3 Video : कार्यक्रमादरम्यान कधी स्किट विसरलात का? समीर-विशाखा सांगतात…
Just Now!
X