महाराष्ट्राच्या भूमीला धगधगता आणि संघर्षमयी इतिहास लाभला आहे. अतुलनीय शौर्य आणि धैर्य दाखवत आजवर अनेक शूरवीरांनी महाराष्ट्राच्या मातीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. छत्रपती शिवरायांच्या एका शब्दाखातर जीवाची बाजी लावणारे अनेक वीरयोद्धा या भूमीने दिले आहेत. ज्यांचे धैर्य, शौर्य आणि आवेश पाहून शत्रूही थबकला होता. अशा झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या अजोड पराक्रमाचा अध्याय लवकरच जगजौहर या चित्रपटातून उलगडण्यात येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

अभिनेता ऋषी सक्सेनाने त्याच्या इन्स्टाग्रामवर हा टीझर शेअर केला आहे. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये अंगावर काटा आणणारी अनेक दृश्य असल्याचं पाहायला मिळत आहे. पन्हाळगडाला सिद्दी मसूदने वेढा दिला, तेव्हा छत्रपती शिवाजीराजे यांनी मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका करुन घेऊन विशालगडाकडे कूच केली. पाठलागावर असलेल्या विजापुरी सैन्याचा धोका लक्षात घेत बाजीप्रभूंनी महाराजांना पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोन्ही बंधू बांदल सेनेसह घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याविरोधात महाकाळ म्हणून उभे ठाकले. हजारोंच्या सैन्याचा मुकाबला करताना बाजी आणि बांदल सेनेच्या वीरांनी पराक्रमाची शिकस्त करत महाराज विशालगडावर पोहचेपर्यंत घोडखिंड प्राणप्रणाने लढवली. याची एक झलक या टीझरमध्ये दाखविण्यात आली आहे.

 

View this post on Instagram

 

“असंल तो सिद्दी तर आम्हीबी हाय जिद्दी स्वराज्यासाठी वार झेलू निधड्या छातीवरती !!” स्वराज्याच्या इतिहासातल्या दैदीप्यमान त्याग आणि बलिदान पर्वाची ही झलक, महाराष्ट्रचरणी अर्पित करीत आहोत ‘जंगजौहर’चा टीझर… #जंगजौहर #JungJauhar #JungJauharTeaser #AAFilms In Association with @almondscreations Written and Directed By : @digpalofficial Produced By : @ajayarekarofficial #AniruddhaArekar

A post shared by Rishi Saxena (@rishi_saxena_official) on

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करत असून अजय-अनिरुद्ध आरेकर हे निर्मिती करत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत झळकणार आहे.