News Flash

‘अग्गंबाई सासूबाई’मधील आजोबांविषयी या रंजक गोष्टी माहितीयेत का?

त्यांनी २०० पेक्षा अधिक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ठरत असलेली ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. या मालिकेतील कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीत उतरले असून आजोबांची चाहत्यांमध्ये चर्चा रंगत आहे. घरात शिस्तीचं वातावरण कायम ठेवणारे पण तेवढेच प्रेमळ असलेल्या आजोबांची स्टाइल अनेकांना आवडत आहे. मालिकेमध्ये आजोबांची भूमिका रवी पटवर्धन यांनी साकारली आहे.

रवी पटवर्धन ८२ वर्षांचे असून या वयातही त्यांचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. रवी पटवर्धन यांनी कलाविश्वामध्ये येण्यापूर्वी रिझर्व्ह बॅकेमध्ये काम केलं होतं. त्यानंतर त्यांचं कलाविश्वात पदार्पण झालं. भारदस्त आवाज आणि उत्तम अभिनयशैली यावर त्यांनी अनेकांची मनं जिंकली. इतकंच नाही तर या कारकिर्दीमध्ये त्यांनी २०० पेक्षा अधिक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर या वयामध्ये त्यांनी भगवतगीतेचे ७०० श्लोक पाठ करून शृंगेरी मठाच्या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे.

दरम्यान, त्यांनी ‘तेरा पन्ने’ ही मालिका गाजवली होती यात हेमा मालिनी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली होती. ‘उंबरठा’, ‘बिन कामाचा नवरा’, ‘शेजारी शेजारी’, ‘अशा असाव्या सुना’, ‘तक्षक’, ‘तेजाब’, ‘नरसिंह’, ‘प्रतिघात’, ‘राजू बन गया जेंटलमेन’, ‘चमत्कार’, ‘युगपुरुष’ अशा अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:18 pm

Web Title: marathi serial agabai susubai ajoba ssj 93
Next Stories
1 ‘कलर्स मराठी अवॉर्ड’मध्ये ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेने मारली बाजी
2 Photo : मेकअपविना ‘या’ अभिनेत्रींना ओळखणंही आहे कठीण
3 ‘कोती’तून उलगडणार तृतीयपंथीयांच्या बालपणीची कथा
Just Now!
X